Bhiwandi Murder : 33 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या! भिवंडीत खळबळ

गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी! हत्येचं कारणही समोर

Bhiwandi Murder : 33 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या! भिवंडीत खळबळ
भिवंडीत तरुणाची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:49 AM

ठाणे : ठाण्यात कामगार पुरवणाऱ्या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. गोळ्या घालून या तरुणाची हत्या करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण या तरुणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश कोकाटे, वय 33, असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे.

ठाणे येथील लोढामध्ये काम पुरवण्याच्या कामावरुन गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात वाद होता. या पूर्वी गणेश कोकाटे यावर गणेश इंदुलकर याने गोळीबार केलेला. त्यात चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक देखील केली होती.

मात्र गणेश इंदुलकर हा फरार होता. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील घरी जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने गणेश कोकाटे याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो फरार झाला.

या गोळीबारामध्ये गणेश कोकाटे हा 33 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. गणेश कोकाटे याला लगेचच ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्यावसायिक वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या हत्याकांड प्रकरणी नारपोलीस पोलीस ठाणे, भिवंडी इथं गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कोकाटेच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी एकूण 3 पथकं तैनात करण्यात आली आहे. लवकरच फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती बल्लाळ यांनी दिली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.