रेल्वेत घुसून गर्दीचा फायदा घ्यायचा, संधी मिळताच डाव साधायचा, सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या

ठाणे रेल्वे पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे (Thane GRP arrest thief who stealing woman purse).

रेल्वेत घुसून गर्दीचा फायदा घ्यायचा, संधी मिळताच डाव साधायचा, सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 8:08 PM

ठाणे : ठाणे रेल्वे पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. हा गुन्हेगार लांब पल्ल्याच्या गाड्या, एक्सप्रेस गाड्यांमध्ये घुसून महिलांच्या पर्स, तसेच प्रवाशांच्या बॅग, मोबाईल चोरी करुन धूम ठोकायचा. अखेर त्याला जेरबंद करण्यात ठाण्याच्या रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीचं नाव निखिल कुमार असं आहे. तो गोव्यातील मडगाव इथला रहिवासी आहे. तसेच तो मुळचा केरळच्या कनौरचा आहे (Thane GRP arrest thief who stealing woman purse).

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणे जीआरपीच्या युनिट-2 च्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपले सर्व गुन्हे कबूल केले आहेत. पोलीस अजूनही आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीत त्याला गुन्ह्यांमध्ये आणखी कुणी मदत करायचं का? याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे (Thane GRP arrest thief who stealing woman purse).

आरोपी चोरी कशी करायचा?

आरोपी हा रेल्वेत गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या बॅगा पळवायचा. तसेच तो महिलांच्या पर्स आणि इतर लगेजचे सामानही पळवायचा. प्रवाशी एक्सप्रेसमध्ये झोपलेले असताना, त्यांनी रेल्वेत मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना तो त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवायचा. त्यानंतर तो योग्य संधी साधत मोबाईल, बॅग किंवा पर्सची चोरी करायचा.

आरोपीकडून 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी आरोपीकडून 50 हजारांचे सोने जप्त केले आहे. तसेच विविध कंपन्यांचे 11 मोबाईल असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने आतापर्यंत किती जणांना लुबाडले आहे, तसेच त्याने आणखी कोणता मोठा गुन्हा तर केलेला नाही ना? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. यासाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा : 

9 दुचाकी आणि 3 आरोपी, कोपरखैरणे पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या, नवी मुंबईत सराईत चोरांची टोळी गजाआड

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.