धरणाच्या गेटजवळ कारमध्ये बसून गटारी साजरी करत होते, दरवाजे उघडले अन् कारसह पाच जणांचे जे झाले ते…

| Updated on: Aug 04, 2024 | 7:39 AM

Mumbai Crime News: कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारने गेले होते. हे मित्र ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडले.

धरणाच्या गेटजवळ कारमध्ये बसून गटारी साजरी करत होते, दरवाजे उघडले अन् कारसह पाच जणांचे जे झाले ते...
धरणाच्या पाण्यात कार वाहून गेली
Follow us on

श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात मासांहारी जेवण आणि मद्यपान अनेक जण करत नाही. त्यामुळे त्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावस्याला पार्टी केली जाते. परंतु हीच दारू पार्टी जीवावर बेतल्याची खळबळकनक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली आहे. या घटनेत पाच जण कारसह वाहून जात होते. त्यातील तिघांनी उड्या मारल्या. परंतु दोन जणांचा मृत्यू झाला. गटारी साजरी करणे त्यांच्या जीवावरच बेतले.

कसा घडला प्रकार

धक्कादायक बाब म्हणजे पाच मित्र कारबसून धरणाच्या मुख्य प्रवाह असलेल्या गेटजवळ गटारीची पार्टी करत होते. त्याच सुमाराला अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते. त्यापैकी एकाच मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला तर दुसरा बेपत्ता झाला तर तीन कारमधून उड्या मारून वाहत्या प्रवाहामधून बचावले आहेत. गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) असे या दुघटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अचानक दरवाजे उघडले अन्…

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने त्यातच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी गटारी साजरी करण्यासाठी हजरो पर्यटक निर्सगाच्या सानिध्यात पार्टीसाठी येतात. कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारने गेले होते. हे मित्र ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडले.

हे सुद्धा वाचा

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते. या पैकी तिघांनी कार बाहेर उड्या मारल्याने बचावले. मात्र दोन जण गाडीत अडकले होते. या पैकी गणपत चिमाजी शेलकंदे याचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. मात्र एकजण आद्यप ही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.