मुंबई : कांदिवली परिसर हत्येच्या (Mumbai Kandivali Murder) घटनेनं पुन्हा हादरला. एका तरुणाची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या करण्यात आली. सध्या पोलिसांनी (Mumbai Police) हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येतो आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी पथकं तैनात केल्याचीही माहिती समोर आली आहे. तरुणांवर काही जणांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. धारदार शस्त्रानं करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये तरुणाचा गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत परिसरात तणाव निर्माण झाला होता. आता या हत्याप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान (Mumbai Murder Mystery) पोलिसांसमोर उभं ठाकलंय. सध्या कांदिवली पोलीस या हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या मागावर आहेत. लवकरच तरुणाच्या मारेकऱ्यांना पकडण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
कांदिवली पूर्व इथे तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी गुन्हाही कांदिवली पूर्व पोलिसांनी दाखल करुन घेतला आहे. अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी लगेचच पुढील तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या तपासात फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जाते आहे. तसंच श्वान पथकही तैनात करण्यात आलंय.
Maharashtra | “The murder of a young man in Kandivali East area of Mumbai created panic. The victim was attacked & his throat was slit with a sharp weapon. Investigation on, case registered. Forensic team & dog squad on spot. 3 teams formed to nab the accused,” says Mumbai police
— ANI (@ANI) July 25, 2022
हत्या झालेल्या ठिकाणी क्राईम सीनचा आधार घेत पोलिसांना श्वान पथकाच्या मदतीने मारेकऱ्यांच्या शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तीन पथकं मारेकऱ्यांना पकडण्यासाठी तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणाच्या हत्येच्या घटनेनं कांदिवली हादरली असून काही दिवसांपूर्वी कांदिवली दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येची घटनाही घडली. त्यानंतर आता तरुणाच्या हत्येच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.
तरुणावर हल्ला करुन मारेकरी फरार झाले आहेत. आता हत्या झालेल्या ठिकाणी काही पुरावे आणि धागेदोरे सापडतात, का याची शहानिशा केली जाते आहे. तसंच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही मदत तपासात घेतली जातेय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पटवण्यासोबत या तरुणाच्या ओळखीच्या व्यक्तींची आता कसून चौकशी केली जाईल. त्यातून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. या हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या कांदिवली पोलिसांपुढे उभं ठाकलंय.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 72 तासांतली ही मुंबईतील हत्येची तिसरी घटना आहे. याआधी दक्षिण मुंबईत एका पतीनं आपल्या पत्नीची हत्या केली होती. तर धारावीतही एका कबड्डीपटूचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आता कांदिवलीत तरुणाची हत्या करण्यात आलीय.