मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांनी एसबीआय एटीएम (SBI ATM) सेंटरवर दरोडा टाकणाऱ्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी एटीएम सेंटरला आग लावणाऱ्या दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एटीएममधील कॅश लोडरचा समावेश आहे. गोरेगाव पूर्व आरपीएफ केंद्राला लागून असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अचानक आग लागली होती. आगीचा तपास करताना एटीएम मशिनमधील कॅश गायब असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरीचा उलगडा केला. (Two accuse were arrested for robbing and setting fire to an SBI ATM in Goregaon)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी एटीएममध्ये कॅश लोड करण्याच्या बहाण्याने 77 लाख रुपये लुटले होते. या लोकांनी हा दरोडा घातला आहे. आग विझवल्यानंतर पोलिसांना आग लागण्यापूर्वी एटीएम मशीनमध्ये 77 लाख रुपये भरल्याचे सांगण्यात आले. वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने एटीएम मशिनमधील कॅश बॉक्स उघडला असता त्यातील पैसे गायब होते. एटीएम कॅश लोड करणाऱ्या ऋतिक यादव आणि प्रवीण पेणकाळकर या दोघांनी 10 दिवसांपूर्वी एटीएम बंद असल्याची तक्रार केली होती आणि एटीएममधून पैसे काढले जात नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कंपनीच्या एटीएमचा पासवर्ड घेऊन एटीएममधून 77 लाख रुपये काढले. पकडले जाण्याच्या भीतीने दरोड्यानंतर एटीएम मशीन पेटवून देण्यात आले. (Two accuse were arrested for robbing and setting fire to an SBI ATM in Goregaon)
इतर बातम्या