दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार

दारु न दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार
दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 6:53 PM

कल्याण (ठाणे) : कल्याण पश्चिमेत एक भयानक घटना समोर आली आहे. दोन नराधमांनी एका तरुणाची रात्रीच्या वेळी वाट अडवली. त्यानंतर त्याच्याकडे दारुची मागणी केली. तरुणाने दारु देण्यास नकार करताच या आरोपींनी त्याच्यासोबत बाचाबाची सुरु केली. हा वाद इतका विकोपाला गेला की रात्रीच्या वेळी रस्त्यावर हाणामारी सुरु झाली. दोन तरुणांनी मिळून एका तरुणाला मरेपर्यंत मारलं. या घटनेने संपूर्ण कल्याण शहर हादरलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दारु न दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दोघा आरोपीना गजाआड केलं आहे. सुनील चौधरी, लुटो महलहार अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघा आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दारु न दिल्याने झालेल्या हत्येच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

घटनेचा थरार

कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकात अजय रावत पायी जात असताना त्याला सुनील चौधरी, लुटो महलहार या दोघांनी हटकले. दोघांनी अजय जवळ दारुची मागणी केली. अजयने दारु देण्यास नकार दिला. यावेळी संतापलेल्या सुनील आणि लुटो दोघांनी अजयला लाथा-बुक्क्यांनी, तीक्ष्ण हत्याराने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय गंभीर जखमी झाला. अजयला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांना आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?

याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय राजेंद्र आहेर, पोलीस अधिकारी प्रमोद सानप यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. खबरींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी एका बांधकाम साईटवर सापळा रचला. त्यानंतर अवघ्या 48 तासात पोलिसांनी आरोपी सुनील चौधरी आणि लुटू मल्हार  या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

उल्हासनगरात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या

उल्हासनगरच्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. सुशांत उर्फ गुड्या गायकवाड असं मृतकाचं नाव आहे. तलवार, चॉपर घेऊन 10 ते 15 जणांनी मिळून सुशांतवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. सुशांत रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला होता. पोलिसांनी जखमी अवस्थेत सुशांत याला रुग्णालयात नेलं. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

खदानीत झाडावर आढळला लटकता मृतदेह, आठ दिवसांपासून बेपत्ता कामगाराचा शोध लागला, हत्या की आत्महत्या?

पळून गेलेल्या जोडप्याला मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीत शोधलं, ग्वालियरमध्ये नेलं, मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला

सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.