प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत

दोन महिलांनी एका तरुणाची निघृणपणे हत्या केली आहे. या हत्येमागील कारण हे फक्त एकच होतं. त्यांच्या कुटुंबातील एका तरुणीवर त्या तरुणाचं प्रेम होतं.

प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत
प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 9:01 PM

मुंबई : प्रेम विवाह ही संकल्पना आजही समाजात हवी तशी रुळ झालेली नाही. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार आहे. तसेच एक मुलगा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडणं ही खूप सर्वसामान्य बाब आहे. काही कुटुंबांना मात्र या गोष्टी मान्य नसतात. काही कुटुंब मुलांची समजूत घालून त्यांची मनं वळवण्यात यशस्वी ठरतात. काही समजुतदार जोडपं स्वत:हून एकमेकांपासून लांब होण्याचा निर्णय घेतात. मात्र, काही कुटुंब हिंसक पाऊल टाकतात. तशीत घटना मुंबईच्या चेंबूर भागात घडली आहे. दोन महिलांनी एका तरुणाची निघृणपणे हत्या केली आहे. या हत्येमागील कारण हे फक्त एकच होतं. त्यांच्या कुटुंबातील एका तरुणीवर त्या तरुणाचं प्रेम होतं.

माने कुटुंबाला प्रेम मान्य नव्हतं

संबंधित घटना ही चेंबूरच्या सह्याद्रीनगर परिसरात घडली. मृतक तरुणाचं नाव सुनील सुधाकर जांभूळकर असं आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेंचे करुणा उर्फ संतोषी माने आणि उषा माने असे नावे आहेत. दोघी महिला या नणंद-भावजय आहेत. त्यांच्या कुटुंबातील एका तरुणीसोबत सुनील याचे प्रेमसंबंध होते. पण ते माने कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यामुळे या मुद्द्यावरुन दोघी महिलांचं सुनील सोबत याआधी देखील भांडण झालं होतं.

महिलांचं प्रियकरासोबत आधी भांडण, नंतर पुन्हा वाद

प्रेम प्रकरणावरुन सुनील याचं प्रेयसीच्या कुटुंबातील महिलांसोबत वारंवार भांडण होऊन देखील तो तिला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला. यावेळी करुणा माने आणि उषा माने यांना सुनील घराजवळ आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सुनीलला शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर त्यांनी सुनीलला पकडलं आणि एका बंद खोलीत नेलं. तिथे त्यांनी सुनीलला प्रचंड मारहाण केली. दोघी महिलांनी लाकडी दांड्यांनी सुनीलला मारहाण केली.

महिलांकडून प्रियकराची हत्या

महिला फक्त इतक्यावरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी ओढणीने सुनीलचा गळा दाबला. यावेळी सुनील श्वास घेण्यासाठी तडफडू लागला. पण निर्दयी महिलांना त्याची दया आली नाही. अखेर सुनीलने श्वास सोडला. त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात पसरली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.

पोलिसांकडून आरोपी महिलेला बेड्या

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर आरोपी महिलांना अटक केली. आरसीएफ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासातून या प्रकरणात आणखी काही वेगळे कंगोरे समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा :

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश

पारनेरमध्ये थरार, पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकावर गोळीबार, 5 लाख लुटले

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.