Ulhasnagar Crime : पार्सला द्यायला उशीर झाल्यानं भडकला! उल्हासनगरमध्ये गावगुंडांनी चायनीज विक्रेत्याला चाकूने भोसकला

Ulhasnagar Crime Video : या घटनेत रुपेश याच्या डोक्यात दुखापत होऊन त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. हाणामारीची ही घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली.

Ulhasnagar Crime : पार्सला द्यायला उशीर झाल्यानं भडकला! उल्हासनगरमध्ये गावगुंडांनी चायनीज विक्रेत्याला चाकूने भोसकला
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 8:17 AM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime News) गावगुंडांनी चायनीज विक्रेत्याच्या हत्येचा प्रयत्न केलाय. पार्सल द्यायला उशीर झाल्यानं गावगुंडांनी चायनीज विक्रेत्यासह (Attack on Chinese vendor) त्याच्या जावयावर जीवघेणा हल्ला चढवला. विठ्ठलवाडी पोलीस (Ulhasnagar News) ठाण्याच्या हद्दीतील व्हीनस चौकात घडलेल्या या घटनेमुळं उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्हीनस चौक परिसर येतो. या चौकात दर्शन राय यांचं मनोज कोळीवाडा हे चायनीजचं दुकान आहे. या दुकानात 12 जूनच्या रात्री सव्वाबारा वाजता ज्ञानेश्वर भोईर हा पार्सल घेण्यासाठी आला. मात्र तोवर दुकान बंद झालेलं असल्यानं राय यांनी त्याला 10 मिनिटं थांबायला सांगितलं. मात्र 10 मिनिटांत पार्सल न मिळाल्यानं त्यानं दर्शन राय यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी दुकानातील कारागिरांनी त्याला प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं.

आधी बाटली डोक्यात फोडली, मग चाकूचा वार

मात्र काही वेळाने ज्ञानेश्वर भोईर हा त्याच्यासोबत कुख्यात गुंड शैलेश भोईर याच्यासह सुशील भोईर, अशोक कोळी आणि अन्य चार पाच जणांना घेऊन आला आणि त्यांनी थेट दर्शन राय यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडत रॉडने मारहाण करण्यात आली, तसंच त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेला त्यांचा जावई रुपेश राय याच्याही डोक्यात बियरची बाटली फोडून सिलेंडर आणि रॉडने मारहाण करण्यात आली. यात दोघे जखमी झालेत.

हे सुद्धा वाचा

दोन्ही हात फ्रॅक्चर

या घटनेत रुपेश याच्या डोक्यात दुखापत होऊन त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. हाणामारीची ही घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली. या घटनेनंतर कारागिरांनी या दोघांना उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं.

तिघांना अटक

या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या तिघांनाही सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.

व्हीनस चौक हा उल्हासनगर शहरातला अतिशय गजबजलेला चौक म्हणून ओळखला जातो. या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली असून पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आव्हान निर्माण झालंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.