उल्हासनगर : मुलांना ज्ञानाबरोबर मूल्य शिक्षण देण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांनी मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले तर अनेक मुले गुन्हेगारीपासून लांब राहू शकतात. यामुळे मुलांना घडवण्यात आई-वडिलांपेक्षाही शिक्षकांचा मोठा वाटा आहे. पोलिसांनी आता मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिले जाते, त्याच ठिकाणी त्यांना गुन्हेगारीपासून रोखल्यास उद्याचे गुन्हेगार तयार होणार नाही.
उल्हासनगर पोलिसांनी केलेला हा उपक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. त्याचे सकारात्मक परिणामही लवकरच दिसणार आहे. उल्हासनगरात वाढत चाललेली बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट शिक्षकांचीच शाळा घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून त्यांना गैरमार्गाला जाऊ न देण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं.
उल्हासनगर परिमंडळ ४ मध्ये गेल्या काही दिवसांत अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच एका टोळक्याने २५ ते ३० गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता. ही तोडफोड करणारी सर्व मुलं एका मोठ्या शाळेत आठवी आणि नववीत शिकणारी असल्याचं समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी उल्हासनगरातील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची एक बैठक आयोजित केली होती. उल्हासनगरात वाढत चाललेली बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट शिक्षकांचीच शाळा घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून त्यांना गैरमार्गाला जाऊ न देण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं.
या बैठकीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवत त्यांना गैरमार्गाला जाण्यापासून रोखावं आणि योग्य शिस्त लावावी, त्यांच्यात जनजागृती करावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. या बैठकीला जवळपास २०० ते २५ शिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.