अल्पवयीन मुलीचा सौदा; दोन महिलांना अटक; पोलिसांनी ‘अशी’ केली मुलीची सुटका
भाईंदरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेश्याव्यवसायासाठी बळजबरी आणलेल्या अल्पवयीन मुलीची दीड लाख रुपयांमध्ये बोली लावणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : भाईंदरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेश्याव्यवसायासाठी बळजबरी आणलेल्या अल्पवयीन मुलीची दीड लाख रुपयांमध्ये बोली लावणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून, आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सापळा रचून आरोपींना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिला आपल्या साथीदार महिलेसह वेश्यव्यवसायासाठी मुली पुरवत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. ही महिला एका अल्पवयीन मुलीच्या सौद्यासाठी भांईदर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. या दोन महिला ठरलेल्यावेळी संबंधित ठिकाणी आल्या. एका पुरुष ग्राहकासोबत या महिलेने या मुलीचा दीड लाख रुपयांमध्ये सौदा केला. मात्र त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली करून मुलीची सुटका केली.
आरोपींची पोलिसांकडून चौकशी
दरम्यान सध्या अटक करण्यात आलेल्या महिलांची चौकशी सुरू असून, या गुन्ह्यामध्ये अन्य कोणी साथिदार आहेत का? आतापर्यंत अशा किती मुलींचा सौदा करण्यात आला. याचा शोध पोलिीसांकडून सुरू आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपींना बेड्या ठोकल्या.
संबंधित बातम्या
रायगडमध्ये महिला सरपंचाची हत्या, ‘ऑस्कर’नं वास घेत आरोपीला पकडलं, वाचा संपूर्ण घटनाक्रम