बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी धारदार ग्राईंडरचा वापर, ठाण्यातील रुग्णालयाचा विचित्रप्रकार

बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी चक्क ग्राईंडरचा वापर करणार्‍या लेक सिटी रुग्णालयाच्या एका सहाय्यकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी धारदार ग्राईंडरचा वापर, ठाण्यातील रुग्णालयाचा विचित्रप्रकार
बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी धारदार ग्राईंडरचा वापर, ठाण्यातील रुग्णालयाचा विचित्रप्रकार
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 3:54 PM

ठाणे : बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी चक्क ग्राईंडरचा वापर करणार्‍या लेक सिटी रुग्णालयाच्या एका सहाय्यकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतर संबधित रुग्णालयाने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यानंतर मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाण्याच्या नितीन कंपनी जवळ, पाचपाखाडी येथे राहणारा पार्थ सतीश टोपले (वय 14) या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी अडकली होती. ही अगंठी निघत नसल्याने या मुलाची आई शितल टोपले यांनी मुलाला 3 जुलैला खोपट येथील लेक सिटी रुग्णालयामध्ये नेले होते. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकार्‍याने मुलाकडे पाहिले नाही. रुग्णालयात उपस्थित असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन औषधे देऊन सदर मुलाला घरी पाठविले.

धारदार ग्राईंडरचा वापर करुन अंगठी काढण्याचा प्रयत्न

त्यानंतर लेक सिटी रुग्णालयातील स्वप्नील होतकर नामक एका इसमाचा फोन शितल टोपले यांना आला. या इसमाने मी लेक सिटी रुग्णालयातून बोलत असून रुग्णालय व्यवस्थापनाने मुलाच्या बोटातील अंगठी काढण्यासाठी आपणाला पाठविले असल्याचे सांगितले. त्यास शितल टोपले यांनी समंती दिल्यानंतर स्वप्नील होतकर हा शितल टोपले यांच्या घरी आला अन् त्याने आपल्याकडील धारदार ग्राईंडरचा वापर करुन अंगठी काढण्याचा प्रयत्न केला.

मुलाचे बोट कापले, नंतर शस्त्रक्रिया

अंगठी निघत नसल्याने त्याचे पार्थ याचे बोटच कापून काढले. या प्रकारानंतर पार्थ याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवाजी रुग्णालयात नेले असता, तेथे त्याच्या बोटाला गँगरीन झाले असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी कांगारु पद्धतीची शस्त्रक्रियाा करण्यात आली. त्याच्या हातावर तसेच पोटावर शस्त्रक्रिया करुन सदरचे बोट सुमारे महिनाभर पोटामध्ये ठेवून आता ते त्याच्या हाताला जोडण्यात आले आहे. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून या प्रकारामुळे पार्थ याच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सध्या त्याचे बोट निकामी झाले असल्याचे शितल टोपले यांनी सांगितले.

मनसेची पोलिसात तक्रार

लेक सिटी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे पार्थ या अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या हाताला गैंगरीन होण्याचा धोका निर्माण झाला असतानाही उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. ही बाब टोपले कुटुंबियांनी अक्षय करंजवकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी शनिवारी (14 ऑगस्ट) नौपाडा पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशार्‍यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी लेक सिटी रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही करंजवकर यांनी दिला आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना उधारी-वसुलीसाठी धमकीचे फोन, कृषी सेवा केंद्राची महिला संचालिका पतीसह पसार

सारं काही संपलं, घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जाण्याचं दु:ख, पत्नी-मुलीचं टोकाचं पाऊल, हृदयद्रावक घटना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.