Video Viral : चोराने आधी विठूरायाला नमस्कार केला…इकडे तिकडे पाहिले अन् हळूच मुकुट चोरला.. व्हिडिओ व्हायरल

Mumbai Police: १० जुलै रोजी प्रकाश वर्मा मंदिरात आला. त्याने विठ्ठलाचे दर्शन घेत नमस्कार केला अन् मुकूट उचलून आपल्या बॅगेत टाकला. त्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या. या मंदिरात भगवान विठ्ठल-रुख्मणी मातेची मूर्ती आहे.

Video Viral : चोराने आधी विठूरायाला नमस्कार केला...इकडे तिकडे पाहिले अन् हळूच मुकुट चोरला.. व्हिडिओ व्हायरल
मंदिरात चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला.
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 10:39 AM

मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. एखादे मंदिर परिसरात प्रसिद्ध झाल्यावर त्या ठिकाणी भाविकांची रिघ लागते. भाविकांची गर्दी होणाऱ्या मंदिरात आणि परिसरात भुरटे चोरी संधी साधतात. भाविकांचे पैसे, मोबाईल लंपास करतात. परंतु मुंबईतील एका चोराने मोठेच धाडसच केले. तो बोरिवलीतील विठ्ठल मंदिरात गेला. त्याने विठूरायाला नमस्कार केला. आपल्या गळ्यात असलेल्या बॅगची चेन उघडली. इकडे तिकडे पाहिले. आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही, त्याची खात्री केली. मग हळूच भगवान विठ्ठल यांच्या डोक्यावर असलेले मुकूट काढले. क्षणात ते बॅगेत टाकले अन् प्रसार झाला. 26 सेंकदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर त्या चोराला अटक करण्यात आली आहे.

चोरचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

१७ जुलै रोजी आषाढी एकादशी होती. त्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात जातात. ज्यांना पंढरपुरात जाऊन दर्शन घेता येत नाही, ते आषाढीच्या दिवशी गावातील मंदिरातच दर्शन घेतात. तसेच त्यापूर्वी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुंबईतील बोरिवलीमध्ये असणारे विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची रिघ असते. त्याच मंदिरात प्रकाश वर्मा(२६) याने चोरी करण्याचे धाडस केले.

हे सुद्धा वाचा

एकडे तिकडे पाहिले अन् मुकूट बॅगेत टाकले

१० जुलै रोजी प्रकाश वर्मा मंदिरात आला. त्याने विठ्ठलाचे दर्शन घेत नमस्कार केला अन् मुकूट उचलून आपल्या बॅगेत टाकला. त्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या. या मंदिरात भगवान विठ्ठल-रुख्मणी मातेची मूर्ती आहे. विठ्ठलास चांदीचे मुकूट ठेवले आहे. प्रकाश वर्माने मुकूट चोरल्यानंतर भाविकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी मंदिर प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली.

अशी झाली अटक

पोलिसांनी मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात प्रकाश वर्मा चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. त्यानंतर त्याच्यापर्यंत पोलीस पोहचले. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ही कारवाई करत आरोपी प्रकाश धनश्याम वर्मा याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुकूट हस्तगत केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.