Video : पक्ष्याला वाचवण्यासाठी थांबले, पण टॅक्सीनं चिरडलं! वांद्रे वरळी सी लिंकवरील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

Amar Jariwala Bandra Worli Sea Link Accident CCTV Video : जरीवाला आणि ड्रायव्हर हे उजव्या बाजूच्या लेनमध्ये हळू हळू सरकताना दिसतात. नेमक्या याच क्षणी भरधाव वेगाने एक टॅक्सी त्यांच्या दिशेने येत.

Video : पक्ष्याला वाचवण्यासाठी थांबले, पण टॅक्सीनं चिरडलं! वांद्रे वरळी सी लिंकवरील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:37 AM

मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर (Bandra Worli Sea link Accident) भीषण अपघात (Road Accident News) झाला होता. आठवड्याभरापूर्वी झालेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज (Accident CCTV Video) समोर आलंय. या अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. एका जखमी पक्ष्याला वाचव्यासाठी व्यावसायिक आणि त्याचा ड्रायव्हर सी लिंकवर थांबले होते. यावेळी भरधाव वेगानं येत असलेल्या एका टॅक्सीनं दोघांना चिरडलं. यात दोघेही जण गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान, व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अमर जरीवाला असं वरळी सी लिंक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. या अपघातप्रकरणी टॅक्सी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. भरधाव वेगानं आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, काळजाचा थरपाक उडवणारं अपघातातं थरारक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. मालाडला जात असतेवेळी वांद्रे वरळी सी लिंकवर हा अपघात झाला होता.

व्हिडीओमध्ये काय दिसतं?

अवघ्या 16 सेकंदाचा अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये पश्चिम उपगराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अमर जरीवाला यांची कार उभी होती. डाव्या लेनमध्ये ही कार थांबलेली असल्याचं दिसतंय. गाडीच्या मागच्या बाजूला दोघेजण उभे आहेत. यात जरीवाला आणि त्यांच्या कारचा ड्रायव्हर असे थांबलेले आहेत. समोर गाडी थांबलेली आहे, हे पाहून सफेद रंगाची एक कार वेग कमी करते आणि उजव्या बाजूने ओव्हरटेक करुन जातना दिसते.

पुढे जरीवाला आणि ड्रायव्हर हे उजव्या बाजूच्या लेनमध्ये हळू हळू सरकताना दिसतात. नेमक्या याच क्षणी भरधाव वेगाने एक टॅक्सी त्यांच्या दिशेने येत. ट्रॅक्सी चालकाला वेग नियंत्रित करता येत नाही. टॅक्सी दोघांना भरधाव वेगातच ठोकर देते. दोघांना हवेत उडवते. जोरदार धडक दिल्यानंतर हवेत उडालेले दोघंही जण जोरदार जमिनीवर आदळतात आणि त्यांनी गंभीर जखम होते. काळजाचा ठोका चुकवणारा या अपघात अंगावर काटा आणणार असतो.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : ही दृश्य तुम्हाला विचलीत करु शकतात

अमर जरीवाला हे एका पक्ष्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. अमर जरीवाला हे चार्टर्ड अकाऊंटंट होतं. मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असायचे. एकादा प्राणी संकटात असल्याचं दिसलं, की ते मदतीसाठी धावून जायचे. इतकंच काय तर लग्नाच्या वरातीत ते घोड्यावरदेखील बसले नव्हते.

कुटुंबीयांचा मोठा निर्णय

दरम्यान, अमर यांच्या कुटुंबीयांनी एक मोठा निर्णय घेतलाय. अमर यांच्या अपघाती मृत्यूनंतर या अपघाताची केस न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तशी विनंतीही त्यांनी मुंबई पोलिसांनी केलीय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.