मुंबईत 15 कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त, आरे पोलिसांनी केली कारवाई

योगेश जोशी हा तरुण आरे परिसरात व्हेल माशाची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक टीम तयार केली आणि आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.

मुंबईत 15 कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त, आरे पोलिसांनी केली कारवाई
मुंबईत 15 कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 4:23 PM

मुंबई : मुंबईच्या आरे पोलिसांनी 5 किलो 65 ग्राम व्हेल माशाची उलटी ( ambergris ) जप्त केली आहे. या उलटीची बाजारात किंमत 15 कोटी 65 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश जोशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

व्हेल माशाची उलटीची विक्री होणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली

योगेश जोशी हा तरुण आरे परिसरात व्हेल माशाची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक टीम तयार केली आणि आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार योगेश जोशी व्हेल माशाची उलटी घेऊन ठरलेल्या ठिकाणी युनिट क्रमांक 5 आरे मार्केट आरे कॉलनी येथे आला. सदर ठिकाणी एक इसम हातात टिफिन बॅग घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. सदर इसमास हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करत पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी योगेश जोशी याच्यावर कलम 2(16)(सी), 9, 39, 44, 48(अ), 49(ब), 57, 51, वन्यजीव संरक्षण कायद्या 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मूळचा बीडमधील रहिवासी

आरोपी योगेश जोशी हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र तो इथे कसा आला ? व्हेल माशआची उलटी त्याने कुठून आणली? कोणत्या व्यक्तीला तो ही उलटी विकणार होता? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीचा वापर द्रव पदार्थ आणि औषध तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीची बाजारात किंमत अधिक आहे. मात्र ही उलटी बेकायदेशीर विकणे गुन्हा आहे.

सदर कारवाई प्रविण पडवळ, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि ज्योती देसाई, पोनि संजय परदेशी, पोउनि उल्हास खोलम, पोना गौतम बडे, पोशि अंबादास भाबड, बिनल शिंगाणे, पंकज ढोक, नागराज गोडसे, भावेश जानराव, अक्षय काटे यांनी केली. (Whale fish’s ambergris worth Rs 15 crore seized in Mumbai)

इतर बातम्या

फोनवर कोणाशी बोलतेयस? वहिनीने उत्तर नाही दिलं, चिडलेल्या दिराकडून गळा चिरुन खून

File Closed: बीडमध्ये पाच खुनांचे गूढ कायम, पोलीस अपयशी! वाचा काय असतो अ-समरी अहवाल?

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.