आर्यन बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा, इतरांचे ‘उद्योग’ काय?; वाचा सविस्तर

जहाजावर ड्रग्जचं रॅकेट पकडल्यानंतर एनसीबीने दिल्लीत तात्काळ छापेमारी सुरू केली आहे. काल एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. (Who is aryan khan, Munmun Dhamecha and other?)

आर्यन बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा, इतरांचे 'उद्योग' काय?; वाचा सविस्तर
NCB arrest Shah Rukh Khan son Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 3:07 PM

मुंबई: जहाजावर ड्रग्जचं रॅकेट पकडल्यानंतर एनसीबीने दिल्लीत तात्काळ छापेमारी सुरू केली आहे. काल एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यनचाही समावेश आहे. इतर आठजणही बड्या बापांची मुलं आहेत. काहींचा स्वत:चा व्यवसाय आहे. तर काही मॉडेलही आहेत.

अटक करण्यात आलेली मुनमुन धमेचा ही दिल्लीतील मॉडल आहे. ती बड्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. इश्मित चड्ढाचा दिल्लीत बिझनेस आहे. तर मोहक जायसवाल हा दिल्लीतील व्यापारी आहे. गोमीत चोपडा हा प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आहे. तो दिल्लीच्या योजना विहार येथे राहतो. गोमीतच्या आईने काल एनसीबीच्या कार्यालयात येऊन चौकशीही केली होती. तर विक्रांत हा दिल्लीच्या एका खासगी कंपनीत प्रोडक्टिव्हिटी हेडच्या पदावर काम करतो. तर सजिता नुपूरचा दिल्लीत मोठा व्यवसाय आहे.

मन्नतची झाडाझडती होणार?

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीपीएस कायतद्यामध्ये हाऊस सर्च करण्याची तरतूद आहे. त्यानुसार काही आरोपींच्या घरी झाडाझडती घेतली जात असल्याने एनसीबीचा मोर्चा मन्नतकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. एनसीबीने जहाजावर छापेमारी करताच काही लोक पळून गेले होते. त्यांचाही शोध घेतला जात आहे. आगामी काळात या प्रकरणात बडे मासे एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यन खान ढसाढसा रडला

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

भारताबाहेर यूके, दुबईतही ड्रग्सचे सेवन

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.

संबंधित बातम्या:

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?

शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?

(Who is aryan khan, Munmun Dhamecha and other?)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.