Kiran Gosavi | नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, पोलिसांना चकवणारा किरण गोसावी आहे तरी कोण?

किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं लोकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाल्या आहेत.

Kiran Gosavi | नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, पोलिसांना चकवणारा किरण गोसावी आहे तरी कोण?
क्रुझ रेडवरील पंच केपी गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 2:25 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात  (Mumbai Cruise Drugs Party) एनसीबीने (NCB) ताब्यात घेतलं, त्यावेळी किरण गोसावी (Kiran Gosavi) हा पंच होता. सुरुवातीला किरण गोसावीचे आर्यनसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो एनसीबी अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र गोसावीशी आपला संबंध नसल्याचं एनसीबीने स्पष्ट केलं. किरण गोसावी याने परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचं आता समोर आलं आहे.

किरण उर्फ के. पी. गोसावी नेमका कोण?

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे.

गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

गोसावीच्या शोधासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं

किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं लोकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाल्या आहेत.

केपी गोसावीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केल्या आहेत. गोसावी हा परराज्यात दडून बसल्याची माहिती असल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस परराज्यात रवाना झाल्या आहेत. गोसावी वारंवार त्याचं लोकेशन बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्याचे शेवटचे लोकेशन आगरतळा येथील होते. त्यामुळे पोलीस आगरतळा येथे जाऊन गोसावी याचा शोध घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुण्यातील तरुणाची फसवणूक

गोसावीने पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली.

पालघरमधील दोन तरुणांचीही फसवणूक

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.

मलेशियात नोकरीचं आमिष

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

संबंधित बातम्या :

नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक, किरण गोसावीच्या महिला सहाय्यकाला अटक

केपी गोसावीचं लोकेशन नेमकं काय?; पुणे पोलिसांचे दोन पथक परराज्यात जाऊन शोध घेणार

आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.