डोक्यावर, अंगावर जखमा, ट्रान्सफॉरमरच्या बाजूला मृतदेह, विजेचा झटका की हत्या? गावात खळबळ
शहापूर तालुक्यातील साठगाव येथे एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे (Youth dead body found suspiciously in Shahapur).
सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील साठगाव येथे एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. मृतक तरुणाच्या डोक्यावर आणि अंगावर जखमा आहेत. त्यामुळे या तरुणाची हत्या झाली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे साठगावसह संपूर्ण शहापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे (Youth dead body found suspiciously in Shahapur).
नेमकं प्रकरण काय?
साठगाव गावाजवळ असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मजवळ काही गावकऱ्यांना सकाळी एका तरुणाचा मृतदेह दिसला. सुरुवातीला लांबून बघितलं तर कुणीतरी झोपलंय, असा अंदाज काही लोकांनी बांधला. मात्र, काही लोकांनी प्रत्यक्ष जवळ जाऊन बघितल्यानंतर तिथे तरुणाचा मृतदेह पडला असल्याचं निदर्शनास आलं (Youth dead body found suspiciously in Shahapur).
पोलीस घटनास्थळी दाखल
संबंधित घटनेची माहिती तातडीने किन्हवली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संबंधित मृतदेहाची ओळख पोलीस येण्याआधीच झालेली होती. मृतदेह हा गावातील 25 वर्षीय तरुण दिनेश केशव विशे याचा होता. त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत टाहो फोडला.
कुटुंबियांचा हत्या झाल्याचा दावा
दिनेशचा मृतदेह विजेच्या ट्रान्सफॉर्मरजवळ सापडल्याने काही लोकांनी विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा दावा केला. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी तो दावा फेटाळला. दिनेशच्या शरीरासह डोक्यावर भरपूर जखमा होत्या. त्यामुळे त्याची निघृण हत्या करण्यात आला असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला.
पोलिसांचा तपास सुरु
दिनेशचा शॉक लागून मृत्यू झाला की हत्या झाली? याचा तपास सध्या किन्हवली पोलीस करत आहेत. सध्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास किन्हवली पोलीस करत आहेत.
हेही वाचा : शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलगडा, निघृणपणे खून करणाऱ्या चौघांना बेड्या