Video : काळ आला होता पण…लोकलच्या मोटर कोचच्या डब्याला लटकला होता तरुण, अचानक हात सटकला अन्…

दानिश खान हा तरुण मध्य रेल्वेवरील कळवा येथील रहिवासी असून तो मुंबईत पीओपीसारखे मजुरीचे काम करतो. नेहमीप्रमाणे 23 जून रोजी सकाळी 9 वाजता तो दादर येथे कामावर चालला होता. सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे दानिश त्याचा आत्येभाऊ आणि काही नातेवाईक तरुणांसह मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होता. यावेळी अचानक त्याचा हात सटकला आणि धावत्या लोकलमधून तो खाली पडला.

Video : काळ आला होता पण...लोकलच्या मोटर कोचच्या डब्याला लटकला होता तरुण, अचानक हात सटकला अन्...
काळ आला होता पण...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:28 AM

मुंबई : लोकल रेल्वेच्या मोटर कोच (Motor Coach)च्या डब्याला लटकून निष्काळजीपणे प्रवास करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे काही तरुण (Youth) लोकलच्या मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होते. याच दरम्यान त्यातील एका तरुणाचा हात निसटला आणि तरुण दोन रेल्वे ट्रॅकमधील गॅपमध्ये पडला. सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र त्याच्या हाताला आणि पायाला जखम (Injury) झाली असून त्याच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दानिश जकिर हुसैन खान (18) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना बाजूच्या लोकलमधील एका व्यक्तीने मोबाईल कैद केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

ट्रेनमध्ये गर्दी असल्याने मोटर कोचच्या डब्याला लटकला होता

दानिश खान हा तरुण मध्य रेल्वेवरील कळवा येथील रहिवासी असून तो मुंबईत पीओपीसारखे मजुरीचे काम करतो. नेहमीप्रमाणे 23 जून रोजी सकाळी 9 वाजता तो दादर येथे कामावर चालला होता. सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे दानिश त्याचा आत्येभाऊ आणि काही नातेवाईक तरुणांसह मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होता. यावेळी अचानक त्याचा हात सटकला आणि धावत्या लोकलमधून तो खाली पडला. सुदैवाने तो दोन ट्रॅकच्या मधल्या गॅपमध्ये पडल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र त्याच्या हाता-पायाला जखम झाली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे EPR नोंद करण्यात आली असून, पुढील अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करीत आहेत.

जखमी तरुणाला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या हाताला आणि पायाला प्लास्टर करण्यात आले आहे. सदर झालेला अपघात हा स्वत:च्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे जखमी इसमाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार समोरून जात असलेल्या ट्रेनमधल्या काही व्यक्तींनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Youth fell and injured while hanging on a local motor coach in central railway)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.