प्रेमात विकृती ! महिलेचा वारंवार लग्नाचा हट्ट, प्रियकराचं संतापजनक कृत्य

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नियोजित विमानतळाच्या जागेत कोल्ही कोपर गावात दत्त मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला 29 मे रोजी एक मृतदेह आढळला होता (Youth murder his girlfriend through ketamine injection in New Mumbai)

प्रेमात विकृती ! महिलेचा वारंवार लग्नाचा हट्ट, प्रियकराचं संतापजनक कृत्य
महिलेचा वारंवार लग्नाचा हट्ट, वैतागलेल्या प्रियकराचं संतापजनक कृत्य
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 5:41 PM

पनवेल (नवी मुंबई) : प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने थेट विषारी इंजेक्शन देवून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही पनवेलच्या कोल्ही कोपर गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने महिलेचा गेल्या आठवड्यात खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी आज त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपीने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. महिला लग्नासाठी हट्ट करत असल्याने तिची हत्या केली, असं कारण आरोपीने सांगितलं आहे.

हत्येचा उलगडा कसा झाला?

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नियोजित विमानतळाच्या जागेत कोल्ही कोपर गावात दत्त मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला 29 मे रोजी एक मृतदेह आढळला होता. संबंधित मृतदेह हा 35 ते 40 वर्षीय महिलेचा असल्याचं नंतर पोलिसांच्या तपासात उघड झालं. परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरु असताना पनवेल तालुक्यातील नानोशी इथले रमेश शिवराम ठोंबरे यांनी सदर महीलेचे प्रेत ओळखून ते त्यांच्या बहीणीचे असल्याचे सांगितले. त्यांनी बहिणीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेलमधील पटेल हॉस्पीटल येथे वॉर्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत गायकर या तरुणाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

चंद्रकांत गायकर याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. “माझे महिलेसोबत मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तसेच तिला गंभीर आजार देखील होता. तरीदेखील ती माझ्यासोबत लग्न करण्याचा आग्रह करून नेहमी वाद घालत होती. सतत धमकी देत होती. त्यामुळे तिच्या त्रासाला कंटाळून तिला विषारी केटामाईन इंजेक्शन देऊन जीवे मारले”, असा कबुली जाबाब त्याने पोलिसांना दिला.

आरोपीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड

पोलिसांनी चंद्रकांत गायकरला याला लगेच अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवळे, हुलगे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे आणि पथकाने केली.

हेही वाचा : अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेहासोबत प्रेयसीचं लगीन लावलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.