गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जिशान सिद्दिकींची रहस्यमय पोस्ट, बाबा सिद्दिकी हत्याकांडबाबत…

| Updated on: Oct 20, 2024 | 10:21 AM

baba siddique death: बाबा सिद्दिकी यांची हत्या १२ ऑक्टोंबर रोजी झाली होती. वांद्रे येथे त्यांचा कार्यालयात बाबा सिद्दिकी आणि जिशान सिद्दिकी बसले होते. त्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जिशान सिद्दिकींची रहस्यमय पोस्ट, बाबा सिद्दिकी हत्याकांडबाबत...
baba siddique zeeshan siddique
Follow us on

Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत ही हत्या आपणच घडवून आणल्याचा दावा केला. सलमान खान यांना जो मदत करेल, त्यांचाबाबत असाच प्रकार होईल, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे मुंबई पोलीस या हत्येचा तपास करत आहे. या हायप्रोफाईल हत्या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी बाबा सिद्दिकी यांचा मुलगा जिशान सिद्दिकी यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर रहस्यमय पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस, जिशान सिद्दिकी

जिशान सिद्दिकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपासावर चर्चा झाली. या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत, त्यावरही चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जिशान सिद्दिकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मोजक्या शब्दांमध्ये लिहिलेली ही पोस्ट रहस्यमयी आहे. या पोस्टचा संदर्भ काय आहे आणि का दिली गेली आहे, याबाबत वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे त्या पोस्टमध्ये

जिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘Not all that is hidden sleeps, Nor all that is visible speaks’  याचा अर्थ दडलेली गोष्ट गडप झालेली नसते आणि समोर दिसणारी गोष्ट सर्व काही सांगतेच असं नाही. त्यामुळे जिशान सिद्दिकी यांना या पोस्टमधून बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात काही इशारा देयायचा आहे का? हा ही एक प्रश्न आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या १२ ऑक्टोंबर रोजी झाली होती. वांद्रे येथे त्यांचा कार्यालयात बाबा सिद्दिकी आणि जिशान सिद्दिकी बसले होते. त्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.