दुचाकी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर यांना अटक
डबेवाल्यांना सायकल ऐवजी दुचाकी घेऊन देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई: डबेवाल्यांना सायकल ऐवजी दुचाकी घेऊन देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे. तळेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घाटकोपर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. (mumbai dabbawala association leader subhash talekar arrested)
डबेवाल्यांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना सायकल ऐवजी दुचाकी देण्यात येणार असल्याचं सुभाष तळेकर यांनी सांगितलं होतं. डबेवाल्यांना आधी मोफत दुचाकी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर त्यांच्याकडून तळेकर यांनी पैसे घेतले. मात्र, पैसे देऊनही दुचाकी मिळत नसल्याने डबेवाल्यांनी अखेर घाटकोपर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तळेकर यांना अटक केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहे.
दरम्यान, जगाने दखल घेतलेल्या डबेवाल्यांनीही स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी नवनव्या संकल्पना स्वीकारण्यास सुरुवात केली होती. ऊन, वारा आणि पावसाची तमा न करता अव्याहतपणे डबे पोहोचवण्याचं काम करणाऱ्या या डबेवाल्यांना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेने पुढाकार घेत नवी मुंबई मधून डबेवाल्यांसाठी या मोपेडची एकत्र खरेदी केली होती. एका मोपेडची किंमतही पाच हजारांनी कमी केल्याने या डबेवाल्यांना दुचाकी देखील स्वस्तात उपलब्ध झाली होती. एवढेच नव्हे तर संध्याकाळी काम संपल्यावर ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू पोहोचविण्याची जबाबदारी जोड धंदा म्हणूनही हे डबेवाल्यांनी घेतली होती. (mumbai dabbawala association leader subhash talekar arrested)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 5 January 2021https://t.co/0zLLxCTOlT#36District72NewsBulletin #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
संबंधित बातम्या:
डबेवाल्यांच्या प्रश्नी मानवाधिकार आयोगाचे मुख्य सचिवांना समन्स
Unlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी
मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब
(mumbai dabbawala association leader subhash talekar arrested)