Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीने त्याच्याबाबत एक दावा केला आहे. आर्यन खानच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह फोटो मिळाल्याचं एनसीबीने म्हटलंय. एनसीबीने आर्यन खानसह अन्य आरोपींची पोलीस कोठडी मागितली आहे.
मुंबई : मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने शाहखुन खानच्या मुलासह 8 जणांना अटक केली आहे. शनिवारी केलेल्या या कारवाईनंतर आर्यन खानसह तिघांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यावेळी आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एनसीबीने आर्यन खानच्या फोनसंदर्भात कोर्टात मोठा दावा केला आहे. (NCB claims in court that offensive photo was found in Aryan Khan’s phone)
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीने त्याच्याबाबत एक दावा केला आहे. आर्यन खानच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह फोटो मिळाल्याचं एनसीबीने म्हटलंय. एनसीबीने आर्यन खानसह अन्य आरोपींची पोलीस कोठडी मागितली आहे. या आरोपींची पोलीस कोठडी मिळाली नाही तर या आरोपींकडे ड्रग्स कुठून आलं हे कळू शकणार नाही असं एनसीबीच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटलंय.
‘युवकांसाठी ही लोकं रोल मॉडेल आणि ही चिंताजनक बाब’
आम्ही मागील वेळीही अनेक लोकांना पकडलं होतं. मात्र यावेळी वेगवेगळी लोकं आहेत. युवकांसाठी ही लोकं रोल मॉडेल असतात आणि ही चिंताजनक बाब आहे. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना आर्यन खानच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह फोटो मिळून आल्याचा दावा एनसीबीने केलाय. त्याचबरोबर फोनमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांकडे लक्ष वेधत चॅटचा उल्लेखही केला आहे.
ड्रग्स प्रकरणात आरोपी आर्यन खानसह अरबाज आणि मुनमुन यांच्यासह 8 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या फोनमध्ये संशयास्पद ट्रान्झॅक्शनचाही उल्लेख आहे. सोबतच ड्रग्सच्या खरेदीसाठी अनेक कोड लँग्वेजचा वापर केला गेल्याचं एनसीबीने म्हटलंय.
आर्यनकडे कोणतेही आमंत्रण नाही
एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही. तो फक्त असे म्हणत आहे की त्याला आमंत्रित केले गेले होते, मग ते कोणी केले, तो योग्य प्रकारे सांगू शकला नाही आणि अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत तो टाळत आहे.
बोर्डिंग पास शिवाय आर्यनला एंट्री देणारा कोण होता, कोणी त्याला आमंत्रित केले होते, हे एनसीबी तपासत आहे. हेच कारण होते की एनसीबीने प्राथमिक चौकशीच्या आधारावर त्याची 2 दिवसाची कस्टडी मागितली
ड्रग्ज सापडले नाही, पण व्हॉट्सअॅप चॅट
एनसीबीच्या सूत्रांनुसार आर्यन चेक इन करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. अरबाजच्या शूजच्या सोलमध्ये ड्रग्ज लपवून आणली गेली होती, जरी आर्यनच्या खिशातून किंवा पिशवीतून ड्रग्ज सापडली नसली, तरी ती ड्रग्ज फक्त आर्यन, अरबाज आणि त्यांच्या साथीदारांच्या वापरासाठी आणली गेली होती, याचा पुरावा आर्यन आणि अरबाजच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सापडला आहे, ज्यामध्ये आर्यन अरबाज मर्चंटला ड्रग आणण्यास सांगत असल्याचे आढळून आले आहे.
इतर बातम्या :
Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ
आर्यन बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा, इतरांचे ‘उद्योग’ काय?; वाचा सविस्तर
NCB claims in court that offensive photo was found in Aryan Khan’s phone