मुंबईतून अपहरण केलेल्या बाळाची पोलिसांनी केली फिल्मीस्टाईल सुटका! पोलिासांची धडाकेबाज कामगिरी
एक वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण प्रकरणाचा अवघ्या 48 तासांच्या आत पोलिसांनी कसा केला पर्दाफाश?
सोलापूर : एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण (Mumbai Kidnapping case) झालेल्या बाळाची फिल्मीस्टाईल सुटका करण्यात आली. सोलापूर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) ही धडाकेबाज कामगिरी केलीय. मुंबईतून एक वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे 48 तासांच्या आतच या अपहरणाचा छडा लावण्यात पोलिसांना (Solapur Railway Police) यश आलंय. मुंबईतून या चिमुरडीला विक्रीसाठी घेऊन जात असताना तिची सुटका करण्यात आली. या अपहरणप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतून एक वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिला विकण्याचा प्लान दोघींनी केला होता. पण पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे हा प्लान असफल ठरला. चिमुकलीला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघी जणींच्या मुसक्या सोलापूर रेल्वे स्थानकातून आवळण्यात आल्या. सोलापूर रेल्वे पोलिसांनीच ही अटकेची कारवाई केली.
मुंबईच्या वांद्रे येथून एक वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या चिमुकलीला घेऊन दोन महिला हैदराबादला गेल्या. पण तिथे गेल्यानंतर बोलणी फिस्कटली होती.
अखेर त्या मुलीला घेऊन पुन्हा मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. मात्र या प्रवासादरम्यान पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. अवघ्या 48 तासांच्या आतच मुंबईतून अपहरण केलेल्या एक वर्षांच्या मुलीला पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकातून आपल्या ताब्यात घेतलं.
हुसेन सागर एक्स्प्रेसमधून हैदराबदून मुंबईच्या दिशेने या मुलीला घेऊन दोन महिला निघाल्या होत्या. याची माहिती मिळताच सोलापूर रेल्वे पोलिसांनी सापळा रचून दोघींना ताब्यात घेतलं.
सोलापूर आरपीएफ जवानांनी हुसेन सागर एक्स्प्रेसची झडकी घेतली. त्यावेळी जनरल डब्यात दोन महिला एका बालिकेला घेऊन बसल्या असल्याचं आढळलं. या महिलांवर संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर महिलांना सोलापूर रेल्वे पोलिसांच्या हवाले करण्यात आलं.
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे रेल्वे पोलिसात एक वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा कसून तपास केला जात होता. रेल्वे पोलीस अधिकारी सतीश विभुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी तातडीने या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे पोलिसांचं सोलापूर पथक आणि इतक खबऱ्यांच्या मदतीचे पोलिसांना या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं आहे. अपहरण झालेल्या एक वर्षांच्या चिमुरडीची सुखरुप सुटका करण्यात आलीय. त्यामुळे या चिमुरडीच्या पालकांचाही जीव भांड्यात पडलाय.