Mumbai Crime : हाय रे किस्मत ! ATM वर दरोडा टाकायचा केला प्लान पण थेट पोहोचले..

एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी चोरट्यांनी जोरदार प्लानिंग केले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे बरेच साहित्य व बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरू आहे.

Mumbai Crime : हाय रे किस्मत ! ATM वर दरोडा टाकायचा केला प्लान पण थेट पोहोचले..
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 10:59 AM

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : माणूस मनात बरंच प्लानिंग करत असतो, स्वप्नही रचत असतो. मात्र त्यातले काही प्लान यशस्वी ठरतात तर काही अयशस्वी होतात. किस्मत का खेल है सारा… एक मोठा प्लान अयशस्वी ठरल्याची अशीच एक घटना मुंबईत घडली. प्लानिंग करणाऱ्यांसाठी ते दु:खद असले तरी त्यांचा प्लान अयशस्वी ठरल्यामुळे इतरांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला. असा काय प्लान होता त्यांचा, जो फसल्यामुळे इतरांना बरं वाटल ? असं काय ठरवलं होतं त्यांनी ?

मुंबईत ही धक्कादायक घटना घडली . तेथे काही दरोडेखोरांनी एटीएम लुटण्यासाठी (ATM Robbery) फुलप्रूफ प्लानिंग केले होते. दरोडा टाकण्याच्या तयारीने ते गेलेसुद्धा, पण हाय रे किस्मत ! त्यांचा प्लॅन अंमलात आणण्याआधीच पोलिसांना याची कुणकूण लागली आणि कांदिवली पोलिसांनी दरोडेखोरांना रंगेहाथ (police arrested robbers) पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य तसेच काही रोख रक्कमही जप्त केली आहे. तसेच सर्व दरोडेखोरांविरुद्ध पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

फसला संपूर्ण प्लान

कांदिवली पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव यांनी याप्रकरणाची माहिती दिली. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास कांदिवली पोलिसांना टीप मिळाली. सेंट्रल बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याची योजना काही लोक आखत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. ही टीप मिळताच कांदिवली पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला आणि एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांचा प्लान अमलात येण्याआधीच पोलिसांनी त्वरित कारवाई करत 4 दरोडेखोरांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आणि बनावट नोटा यासह चाकू, कटर, स्क्रू ड्रायव्हर, दोरी, तिखट असे दरोड्यासाठीचे साहित्य देखील जप्त केले

या सर्व दरोडेखोरांविरुद्ध पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. नासिर अली बाबर अली मुल्ला (वय ३२), कमलप्रकाश पद्मसिंग यादव उर्फ कमल (वय ४०), राममूर्ती रवींद्रनाथ अय्यर (वय २६), इसराईत मुन्ना खान (वय २८), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण पालघर आणि जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत.

नासिर अली बाबर अली मुल्ला याच्याविरुद्ध कांदिवली, मालाड, ओशिवरा, विलेपार्ले पोलिस ठाण्यात फसवणुकीचे 7 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी कमल प्रकाश पद्मसिंग यादव उर्फ कमल याच्यावरही कांदिवली, मालाड, ओशिवरा, विलेपार्ले येथे दरोडा आणि फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.