रात्रीच्या सुमारास सोसायट्यांमध्ये चोरी करुन पसार व्हायचे, ‘स्पायडर मॅन’ टोळीला पोलिसांकडून अटक

रात्री सोसायट्यांमध्ये घुसून चोरी करायचे अन् पसार व्हायचे. अंधेरीपासून कांदिवलीपर्यंत आपला चोरीचा धंदा ही टोळी करत होती.

रात्रीच्या सुमारास सोसायट्यांमध्ये चोरी करुन पसार व्हायचे, 'स्पायडर मॅन' टोळीला पोलिसांकडून अटक
समता नगर पोलिसांकडून चोरट्यांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 9:56 AM

मुंबई : हल्ली चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः सोसायट्यांमध्ये घुसून चोरी करण्याचे प्रमाण मोठे आहे. अशीच एक घटना कांदिवलीत घडली होती. घरातील ऐवज लुटल्यानंतर चोरटे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करुन या ‘स्पायडर मॅन’ नावाच्या चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी अंधेरीपासून कांदिवलीपर्यंत सक्रिय होती. या चोरट्यांनी आतापर्यंत चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत. चेतन प्रकाश राठोड, दीप प्रकाश पांचाळ आणि अंबिका शंकर राठोड अशी तिन्ही आरोपींची नावे असून, त्यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी अंधेरीचे रहिवासी आहेत. आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

समता नगरमधील आयकॉन सोसायटीत घडली होती चोरीची घटना

कांदिवली पूर्वेतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयकॉन सोसायटीत 17 जून रोजी रात्री या टोळीने चोरी केली होती. चोरट्यांनी सोन्याची चैन, कानातले, सोन्याच्या अंगठ्या आणि एक हिऱ्याची अंगठी चोरुन नेली होती. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे 1 लाख 85 हजार रुपये आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात पीडितांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या माहितीवरुन टोळीला अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर समतानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि सहायक पोलीस निरीक्षक संदिपान उबाळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. सूत्रांची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने समता नगर पोलिसांनी अंधेरी येथून 1 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली. तिन्ही आरोपींकडून 25 ग्रॅम सोन्याची रॉड, सोन्याची चैन आणि हिऱ्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.