एकटी असल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग, अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

बेलापूरहून गोरेगावला जात असताना आरेच्या जंगलात संधी साधून रिक्षाचालकानेच महिलेचा विनयभंग केला. यानंतर महिलेला धमकावल्याने तिने ही बाब कुणालाच सांगितली नव्हती. मात्र अखेर ही बाब उघडकीस आली.

एकटी असल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग, अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला !
रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 11:18 AM

मुंबई : रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अखेर आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंद्रजित सिंग असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी 6 जुलै रोजी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. आरे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, 354 बी, 509, 323, 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. ही घटना 17 मे रोजी घडली होती. मात्र मारहाण आणि धमकीमुळे घाबरेलल्या महिलेने याबाबत कुणालाही सांगितले नाही. मात्र मारहाणीमुळे महिलेला सतत त्रास होत होता. यामुळे कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सर्व प्रकार सांगितला.

बेलापूरहून गोरेगावला परतत होती महिला

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी महिला नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथून गोरेगावला परतत होती. गोरेगाव येथील आरेच्या जंगलात रिक्षा येताच सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रस्ता निर्मनुष्य असल्याची संधी साधली. रिक्षा चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने रिक्षा थांबवली. यानंतर रिक्षातच महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध करताच आरोपीने तिला मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे महिलेने याबाबत घरच्यांना काहीच सांगितले नाही.

पीडितेला सतत रक्तस्त्राव होत असल्याने घरच्यांनी विचारणा केली

पीडितेची दोन महिन्यांपूर्वी डिलीवरी झाली होती. मारहाणीमुळे तिचे टाके तुटले होते आणि तिला सतत रक्तस्त्राव होत होता. यामुळे कुटुंबीयांनी महिलेकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी 6 तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेच्या जबाबवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.