अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा असे दुष्कृत्य केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 4:03 PM

अलिबाग : राज्यात महिला अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पेण तालुका हादरला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा असे दुष्कृत्य केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Murder of two and a half year old Girl after rape accused arrested by pen police)

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील मळेघर वाडी इथल्या साबर सोसायटीमधील मोतीराम तलाव इथं आदीवासी वाडीत ही घटना घडली आहे. एका अडीच वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला असून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

खरंतर, राज्यात गुन्हेगारांना कसलाही धाक उरला नाही हेच या घटनेमुळे समोर येत आहे. आरोपी हा आधीच एका बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. पण तरीदेखील त्याला कायद्याची भीती नव्हती. त्याने एका गुन्ह्यानंतर आणखी एक गुन्हा करण्याचं धाडस केलं. राज्यात जर गुन्हेगार अशा प्रकारे मोकाट फिरणार असतील तर पोलिसांचा धाक राहिला आहे का? असाच प्रश्न समोर येत आहे.

अधिक माहितीनुसार, पेण पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याला आधीही बलात्कारप्रकरणी अटक झाली होती. रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे हे प्रकरणात पुढील तपास करत आहेत. परंतु आदीवासी समाजामध्ये मात्र या घटनेने तीर्व सतांप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी उद्या पेण बदंची हाक देण्यात आली. (Murder of two and a half year old Girl after rape accused arrested by pen police)

संबंधित बातम्या –

लग्नाच्या मंडपात आचाऱ्याची हत्या, पोलिसांकडून दोन आरोपीना अटक

अक्सा बीचवर सापडलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, सासरा गजाआड

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

(Murder of two and a half year old Girl after rape accused arrested by pen police)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.