दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

कळवा खरेगाव येथे शुक्रवारी एक अज्ञात तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती कळवा पोलिसांना (Kalwa Police) मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता मयताच्या शरीरावर मारहाण केल्याचा जखमा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली.

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड
ठाणे हत्येच्या आरोपींना कळवा पोलिसांकडून अटक
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 9:52 PM

ठाणे : दारुसाठी दिलेल्या पैशाच्या वादातून बाचाबाची झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण करुन एकाची हत्या (Murder Case) केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. पोलिसांनी तपास करत अवघ्या 12 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कळवा खरेगाव येथे शुक्रवारी एक अज्ञात तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती कळवा पोलिसांना (Kalwa Police) मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता मयताच्या शरीरावर मारहाण केल्याचा जखमा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली.

मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपी कोण याची माहिती मिळवण्यासाठी कळवा पोलिसांनी 2 पथकं तयार केली. तपासादरम्यान पोलिसांना मृत व्यक्ती हा कळव्याच्या इंदिरानगर परिसरात राहणारा असल्याचं समजलं. त्याचं नाव गुलाम सलामत शेख असे नाव असल्याचे कळालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. हत्येच्या 12 तासांच्या आत पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्या तीन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. आकाश पळस, सनी सोनकर आणि फैजल खान अशी या तीन आरोपींची नावं आहेत. हे तीन्ही आरोपी कळव्याच्या इंदिरानगर परिसरातील आहेत. आरोपी आणि मयत यांच्यात दारूच्या पैशावरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी मयत गुलाबला लोखंडी पाईपने मारहाण केली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

महामार्गावर वाहनांना लुटणार टोळी गजाआड

दुसरीकडे मुंब्रा पनवेल महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहन चालकांना लुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सदर मार्गावर असलेल्या गतिरोधकाच्या ठिकाणी वाहने हळू झाली की त्या वाहनांना अडवून चालकांना लुटणारी टोळी येथे कार्यरत होती. ही टोळी वाहनचालकांकडील मोबाईल आणि रोकड लुटून घेत होती. वारंवार घडणाऱ्या या लुटीच्या घटनांमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटना रोखण्याचे आदेश डायघर पोलिसांना दिले. त्यानुसार डायघर पोलिसांनी घटनास्थळी पाळत ठेवली होती.

डायघर पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा

दरम्यान 1 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा-पनवेल महामार्ग, हॉटेल रॉयल याठिकाणी वाहन चालकास लुटल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना स्थानिक खबऱ्यांकडून दोन जण दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पकडलेल्या दोन्ही आरोपींकडून लुटीतील 7 हजार 500 रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक चौकशीत सदरचे आरोपी यांनी मुंब्रा व ताडदेव येथे प्रत्येकी एक आणि डायघर पोलीस ठाणे हद्दीत दोन असे एकूण चार गुन्ह्यांची कबुली दिली. तर त्यांच्या अधिक चौकशीत आणखी लुटीचे आणि चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. दरम्यान, गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी विनंती ठाणे पालिका, स्थानिक प्रशासन व काही सामाजिक संस्था यांना करण्यात आल्याची माहिती डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी दिली.

इतर बातम्या :

Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला

भाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.