दारुच्या नशेत गावगुंडांची पोलिसाला लाठ्या काठ्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात गावगुंडांनी शनिवारी रात्री उशिरा यूपी पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात गावगुंडांनी शनिवारी रात्री उशिरा यूपी पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
संबंधित घटना चौरी चौरा भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौरी चौरा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनबरसा चौकी अंतर्गत रामपूर येथील दारुच्या दुकानाजवळचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका पोलिसाला मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रात्री उशिराचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौरी चौराचे सीओ जगत राम कनोजिया आणि ठाणे अंमलदार श्याम बहादूर सिंह पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सुमारे चार ते पाच तास प्रयत्न केले. या घटनेत सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. चौरी चौराच्या रामपूरमध्ये पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करतायत. गावगुंडांनी पोलिसांना का मारहाण केली, याचा शोध घेतला जात आहे. सीओ जगतराम कनोजिया यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओच्या आधआरे तपास सुरु आहे. संबंधित घटनेमधल्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही.
पाहा व्हिडीओ :
#BreakingNews #Viral गोरखपुर में गश्त कर रहे पुलिसकर्मियों पर लाठी-डंडे से लैस शराबियों ने पुलिसकर्मियों को दौड़ा-दौड़ाकर पीटा | मुख्य आरोपी की तलाश जारी | चौरीचौरा थाना क्षेत्र के रामपुर बुजुर्ग का मामला | @gorakhpurpolice | @Uppolice | @TV9Bharatvarsh | pic.twitter.com/4MYsq3O1aH
— TV9 Uttar Pradesh (@TV9UttarPradesh) October 23, 2021
हे ही वाचा :
Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी पुन्हा एकदा आर्यनच्या भेटीला
गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यू