क्या हुआ तेरा वादा? अनेक वर्ष शारीरिक संबंध, पण लग्नाच्यावेळी पाठ दाखवली, पीडितेची मन हेलावणारी कहाणी
या जगात प्रेम ही भावना खूप सुंदर आहे. पण आपण कुणावर प्रेम करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण भाबडेपणात कुणावरही प्रेम करुन बसलं की आपल्या जीवाला प्रचंड घोर होतो. पुढे आपल्याला त्याचा त्रास आणि पश्चात्ताप दोन्ही होतं.
पाटणा : या जगात प्रेम ही भावना खूप सुंदर आहे. पण आपण कुणावर प्रेम करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण भाबडेपणात कुणावरही प्रेम करुन बसलं की आपल्या जीवाला प्रचंड घोर होतो. पुढे आपल्याला त्याचा त्रास आणि पश्चात्ताप दोन्ही होतं. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याची पात्रता आहे ना? याची शहानिशा जरुर करावी. कारण आज प्रेमाच्या नावाने फसवणुकीच्या घटनाच जास्त समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेम करण्याआधी समोरची व्यक्ती भविष्यात आपली फसवणूक करणार नाही, हे एकदा तपासून घ्यावं. अन्यथा आपल्या हाती पश्चात्तापाशिवाय काही शिल्लक राहत नाही. बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका गावात अशीच एक घटना समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवत अनेक वर्ष आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा प्रियकराने धोका दिला. विशेष म्हणजे आरोपीने मुलीचं मन राखण्यासाठी जगापासून लपूनछपून तिच्यासोबत खोटा निकाह केला. पण पीडितेने चारचौघात लग्न करण्यास सांगितलं तेव्हा त्याने नकार दिला. त्यामुळे पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली खूप मोठी फसवणूक झालीय, याची जाणीव तिला झाली.
या दरम्यान तिच्या कुटुंबियांना देखील या प्रकरणाची माहिती मिळाली. तिच्या कुटुंबियांनी आरोपीला लग्न करण्यासाठी दबाव टाकला. पण आरोपीने ऐकलं नाही. विशेष म्हणजे या प्रकरणावरुन गावात पंचायत बसवली गेली. पण आरोपीने पंचायतीत गावासमोर आपण पीडितेसोबत काहीही केले नसून आपला तिच्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे तिच्यासोबत लग्न करणार नाही, असं आरोपी भर चौकात बोलला. त्यामुळे अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस त्याला आता न्यायालयीन कोठडीत पाठवत आहेत.
पीडितेची प्रतिक्रिया काय?
“दोन वर्षांपासून आम्ही एकमेकांना प्रेम करत होतो. या दोन वर्षात अनेकवेळा आम्ही दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा मी 18 वर्षाची पूर्ण झाली तेव्हा मी त्याला लग्नासाठी विनंती केली. तो मला एका रात्री घेऊन गेला. त्याने माझ्याशी लपतछपत निकाह देखील केला. त्यानंतर त्याला लग्नासाठी विनंती केली तेव्हा त्याने थेट नकार दिला. आरोपीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याला जेलमध्ये पाठवा”, अशी प्रतिक्रिया पीडितेने दिली आहे.
हेही वाचा :
औरंगाबादेत सोनसाखळी हिसकावण्याची मालिका सुरूच, ज्योती नगरात घटना, चार दिवसात सहा चोऱ्या
जुळ्या भावांंचा एकत्रच अंत, 25 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मध्यरात्री एक वाजता नेमकं काय घडलं?