Pune Crime | थरकाप उडवणाऱ्या नागेश कराळे खून प्रकरणात मोठी घडामोड, 6 जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई
जिल्ह्यातील शेलपिंपळगाव येथील पैलवान नागेश सुभाष कराळे (वय 38) यांच्या खूनप्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यानुसार म्हणजेच 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली आहे.

पुणे : जिल्ह्यातील शेलपिंपळगाव येथील पैलवान नागेश सुभाष कराळे (वय 38) यांच्या खूनप्रकरणातील (Murder) सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यानुसार म्हणजेच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत चाकण पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली आहे. आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर दोन पिस्तुलमधून (Revolver) बारा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृणपणे त्यांचा खून केला होता.
बारा गोळ्या झाडून, कोयत्याने वार करून हत्या
या खूनप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर (वय 38), लक्ष्मण बाबूराव धोत्रे (वय 34, दोघेही रा. शेलपिंपळगाव), ओंकार भालचंद्र भिंगारे (वय 22, रा. उरवडे, ता. मुळशी), फिरोज ऊर्फ समीर कचरू सय्यद (वय 24, रा.कासुर्डी, ता. दौंड) आणि खुनाच्या कटात सहभागी असलेले आरोपी शिवशांत शिवराम गायकवाड (वय 43), सोपान नामदेव दौंडकर (वय 50, दोघेही रा. शेलपिंपळगाव) यांना अटक केली आहे. त्यांनी नागेश कराळे याच्यावर दोन पिस्तुलमधून बारा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून कराळे यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या खुनाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आरोपींनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला मास्क लावले होते.
पिस्तूल, दोन खाली मॅक्झीन, आठ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता जप्त
दरम्यान, जुन्या वादाच्या कारणावरून संगनमताने कट रचून कराळे यांचा खून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. प्राथमिक तपासातून तसे समोर आले आहे. पोलिसांनी आपल्या कारवाईत आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन खाली मॅक्झीन, आठ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटार सायकल व स्कॉर्पिओ जीप जप्त केली आहे. आरोपींनी कराळे यांचा खून केल्यानंतर गुन्हा करताना त्यांच्या अंगावरील कपडे जाळून टाकली व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्यांना आता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी केली.
इतर बातम्या :
Crime | जिगोलो बणण्याची हौस पडली महागात, मोठी फसवणूक होताच तरुणाची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं ?