सना खान हत्या प्रकरण, का झाला सना खान यांचा खून? दोन आरोपींना नागपुरात आणलं
आरोपी अमित शाहू हा जबलपूर येथील वाळू आणि दारु तस्कर आहे. त्याच्याशी सना खान यांनी रजिस्टर्ड मॅरीज केले. सना खान भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या.
नागपूर : भाजप कार्यकर्त्या (BJP leader) सना खान या जबलपूरला गेल्या होत्या. दोन ऑगस्ट रोजी त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ दाखवत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी नागपूर पोलिसांत (Nagpur police) तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हिरण नदीत सना खान (Sana Khan) यांचा मृतदेह सापडला. हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती आरोपी अमित शाहू याने दिली. सना खान यांचे दागिने अमित शाहू याने विकले असल्याने वाद झाला असल्याची माहिती सुद्धा पुढे आली.
सना खान यांच्या डोक्यावर मारला रॉड
सना खान आणि अमित शाहू यांच्यात रजिस्टर्ड मॅरेज झाले. त्यानंतर काही महिन्यातच ही घडली. दहा दिवसांपासून बेपत्ता भाजपच्या नागपुरातील नेत्या सना खान यांची २ ॲागस्टला रोजी हत्या झाली. आरोपी अमित शाहू आणि सना खान यांच्या पैशावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपीने सना खान यांच्या डोक्यावर रॅाड मारला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
पैशाच्या वादातून हत्या
सना खान आणि आरोप अमित शाहू यांच्यात व्यवसायिक भागीदारी आणि पैशांच्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अमित शाहू आणि राजेश सिंग याला नागपूर पोलीसांनी अटक करून नागपुरात आणलं. राजेश सिंग हा अमित शाहू यांचा चालक आहे.
कोण आहेत सना आणि अमित
आरोपी अमित शाहू हा जबलपूर येथील वाळू आणि दारु तस्कर आहे. त्याच्याशी सना खान यांनी रजिस्टर्ड मॅरीज केले. सना खान भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. व्यवसायातील भागिदारीवरून वाद झाल्याने अमितने सना खानला संपवले. अमित शाहूचा चालक जितेंद्र गोंड यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली.