नायब तहसीलदाराच्या पत्नीचे हातपाय बांधून दागिने पळवले, 60 तासांनंतर….

अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील नायब तहसीलदाराच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधणारे आणि 5 लाखांचे दागिने चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नायब तहसीलदाराच्या पत्नीचे हातपाय बांधून दागिने पळवले, 60 तासांनंतर....
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 4:08 PM

स्वप्निल उमप, Tv9 प्रतिनिधी, अमरावती | 2 जानेवारी 2024 : अमरावती येथील राठी नगरातील भरदिवसा झालेल्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी 60 तासात छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडे देशी कट्टा आणि चाकू सापडले आहेत. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. विशेष म्हणजे घटनेतील मुख्य आरोपी हा नायब तहसीलदाराच्या घरीच चालक म्हणून काम करत होता. आरोपींनी जनगणनेच्या नावाखाली नायब तहसीलदाराच्या घरात घुसून लूट केली होती. आरोपींनी नायब तहसीलदाराच्या पत्नीचे हातपाय बांधून बंदुकीच्या धाकावर 5 लाखांचे दागिने पळवले होते. याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून चोरी केलेले 5 लाख 30 हजार रुपयांचे ऐवज जप्त केले आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती. सर्वेक्षणाच्या नावाखाली भरदिवसा चोरी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला तपास केला तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन आरोपी घटनेच्या दिवशी कैद झालेले बघायला मिळाले होते. त्याच आधारावर पोलिसांनी पुढचा तपास केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तब्बल 8 पथकं तैनात केली होती. पोलिसांनी तपासादरम्यान तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमरावती शहराच्या राठी नगरात वास्तव्यास असणारे नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी ही जबरी चोरीची घटना घडली होती. चोरीची घटना घडली तेव्हा प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी जयश्री अजसुळे या घरातच होत्या. दोन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या घरी गेले होते. आम्ही जनगणना करायला आलो आहोत, तुमचं आधारकार्ड दाखवा, असं सांगून हे आरोपी घरात शिरले होते. त्यानंतर त्यांनी पुढे शस्त्र दाखवत जयश्री अडसूळ यांचे हातपाय बांधले होते. त्यानंतर आरोपींनी घरातील तब्बल 5 लाखांचे दागिने पळवून नेले होते. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. संबंधित प्रकरणानंतर गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी घटेननंतर 60 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....