कार अपघातात गडचिरोलीतील भाजप नेत्याचा मृ्त्यू, भाऊही जखमी
आनंद गण्यारपवार व त्यांचा भाऊ अतुल गण्यारपवार हे दोघेही नागपूरला जात असतानाच पहाटे अपघात झाला, या अपघातात भाजपाचे जिल्हा सचिव असणारे आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला आहेत ते हे 'मन की बात' या कार्याक्रमाचे जिल्हा संयोजक होते.
गडचिरोलीः आरमोरी-ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) ट्रॅक्टर आणि कारची समोरासमोर बसलेल्या धडकेत गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे (Bharatiy Janata party ) जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे भाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल गण्यारपवार हे जखीम झाले आहेत. आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावर गुरूवारी पहाटे गण्यारपवार यांच्या कार आणि ट्रॅक्टर यांच्यामध्ये अपघात झाला.आनंद गण्यारपवार यांच्या मूर्त्यूमुळे चार्मोशी गावावर शोककळा पसरली आहे. आनंद गण्यारपवार हे परिसरात हसतमुख असणारे व्यक्तमत्व होते. जिल्ह्यातील मन की बात कार्यक्रमाचे आनंद गण्यारपवार हे संयोजक असल्याने जिल्ह्यातील अनेक नागरिकांचा त्यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे गावासह तालुक्यातील नेत्यांना धक्का बसला आहे.
आनंद गण्यारपवार व त्यांचा भाऊ अतुल गण्यारपवार हे दोघेही नागपूरला जात असतानाच पहाटे अपघात झाला. भाजपाचे जिल्हा सचिव असणारे आनंद गण्यारपवार हे ‘मन की बात’ या कार्याक्रमाचे जिल्हा संयोजक होते. गुरुवारी ते मुंबईला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. रणमोचन फाट्याजवळ आले असताना कार आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रॅक्टरचे दोन भाग झाले आहेत. या अपघातात कारच्या मागे बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले तर त्यांचा भाऊ कारमधील एअर बॅगमुळे या अपघातातून बचावले आहेत. तर ट्रॅक्टरचालकही या अपघातात किरकोळ जखमी आहे.
विमानाने जाणार होते मुंबईला
विमानाने मुंबईला जाण्यासाठी हे दोघे बंधू नागपूरला निघाले होते. पहाटे जात असताना महामार्गावरून येत असलेल्या ट्रॅक्टरचा आणि गण्यारपवार यांच्या कारमध्ये समोरोसमोर धडक अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे दोन भाग झाले आहेत. अपघातातील जखमी अतुल गण्यारपवार आणि ट्रॅक्टरचालक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या