AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजीला म्हणाला ‘लवकर जाऊन येतो’, पण नववीतील तो विद्यार्थी जिवंत परतलाच नाही! थेट मृतदेहच घरी आला

Bhandara Drowned News : भारत हा अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवन शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. भारतच्या आजीने त्याला सकाळी जेवण करायला सांगितलं. पण बाहेर जाऊन लवकर येतो, असं सांगून तो निघून गेला होता.

आजीला म्हणाला 'लवकर जाऊन येतो', पण नववीतील तो विद्यार्थी जिवंत परतलाच नाही! थेट मृतदेहच घरी आला
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 8:14 AM

भंडारा : नाशिकमध्ये (Nashik News) 25 वर्षांचा तरुण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक दुःखद घटना भंडाऱ्यातून (Bhandara Drowned) समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तलावाच्या पाण्यात नववीत शिकणारा भारत पाठक (Bharat Pathak) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. ‘लवकर जाऊन येतो’, असं आजीला सांगून भारत घरातून गेला होता. पण तो जिवंत परतलाच नाही. त्याचा मृतदेहच थेट घरी आल्यामुळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

भारत ओमप्रकाश पाठक हा 15 वर्षांचा मुलगा पवनी तालुक्यातील चकारा या गावात राहायला होता. गावालगत असलेल्या मालगुजारी तलावावर भारत अंघोळीसाठी गेला होता. पण तिथेच त्याचा बुडून मृत्यू झाला होता. चार तास शोध घेतल्यानंतर भारतचा मृतदेह आढळून आला.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

हे सुद्धा वाचा

लवकर येतो, म्हणाला होता! पण…

भारत हा अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवन शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. भारतच्या आजीने त्याला सकाळी जेवण करायला सांगितलं. पण बाहेर जाऊन लवकर येतो, असं सांगून तो निघून गेला होता. त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर भारतची सायकल, कपडे आणि चपला दिसून आल्या. हे कळताच गावातील लोकांनी तलावाजवळ धाव घेतली.

या संपूर्ण प्रकाराची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सौंदड येथील मासेमारांना भारतचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 15 वर्षांच्या भारतचा मृतदेह तलावात आढळून आला. यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर संपू्र्ण गाव शोकाकूल झाला होता.

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुकंला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुकंला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.