तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : पार्टीत मद्यपान केल्यानंतर झालेल्या वादानंतर 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. लोखंडी रॉडने वार केल्यानंतर चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिमन्यू अरविंद माने असे 22 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बघेडा येथे ही घटना उघडकीस आली.
नेमकं काय घडलं?
अभिमन्यू माने बघेडा येथे मित्राकडे पार्टीसाठी गेला होता. तिथे मद्यप्रशन केल्यानंतर तरुणांमध्ये वाद झाला. वादात लोखंडी रॉडने वार करुन आरोपीने अभिमन्यूची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाजवळील नाल्यात फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. गोबरवाही पोलिसानी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
सांगलीत जन्मदात्रीकडून मुलीची हत्या
दुसरीकडे, सांगलीच्या संजय नगरमधील दडगे प्लॉटमध्ये राहणाऱ्या दोन वर्षांच्या बालिकेचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. बालिका गतिमंद असल्याने आईनेच एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी 26 वर्षीय संशयित रेवती संजय लोकरे हिला अटक केली आहे.
दडगे प्लॉटमध्ये आई, आजी, आत्या आणि चुलत्यांसमवेत राहणाऱ्या ज्ञानदा संजय लोकरे (वय 2) हिचा अचानक मृत्यू झाला होता. मुलीला बोलता येत नसल्याने आणि ती गतिमंद असल्याने हे कृत्य केल्याची कबुली आई रेवती लोकरेने पोलीस तपासादरम्यान दिली.
संबंधित बातम्या :
बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या
नागपुरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या मारहाणीमुळे जीव दिल्याचा आरोप
बाईकवर टेम्पो घालून सोलापुरात शिवसैनिकांची हत्या, पाच संशयितांना कर्नाटकातून अटक