रेल्वेचा स्निफर डॉग रॉकीची कमाल, भंडाऱ्यात ट्रेन टॉयलेटवर लपवलेला 33 किलो गांजा पकडला

रेल्वे टॉयलेटच्या छतावर लपवून ठेवलेला 33 किलो गांजा रेल्वेच्या स्निफर डॉगने पकडून दिला. ही घटना पुरी- अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये भंडारा रेल्वे स्थानकावर घडली.

रेल्वेचा स्निफर डॉग रॉकीची कमाल, भंडाऱ्यात ट्रेन टॉयलेटवर लपवलेला 33 किलो गांजा पकडला
भंडाऱ्यात ३३ किलो गांजा पकडला
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 12:57 PM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा: रेल्वेचा स्निफर डॉग रॉकीने तब्बल 33 किलो गांजा पकडला. रेल्वे टॉयलेटच्या छतावर पॅकेटमध्ये गांजा लपवून ठेवला होता. मात्र स्फोटक तपासणीसाठी रेल्वे पोलिसांसह ट्रेनमध्ये चढलेल्या रॉकीने 3 लाख 29 हजार रुपये किमतीचा गांजा शोधून काढला. पुरी- अहमदाबाद एक्स्प्रेस भंडारा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना हा प्रकार घडला. (Bhandra Railway Police Sniffer Dog Rockey detained Cannabis Ganja from Puri Ahmedabad Express Train)

रेल्वेतून गांजा तस्करी करण्यासाठी आरोपी काय प्रकार करतील, याचा काही नेम नाही. असाच काही प्रकार भंडारा रेल्वे स्थानकावर अनुभवाला आला. रेल्वे टॉयलेटच्या छतावर लपवून ठेवलेला 33 किलो गांजा रेल्वेच्या स्निफर डॉगने पकडून दिला. ही घटना पुरी- अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये घडली.

नेमकं काय घडलं?

भंडारा रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली असताना, रेल्वेचा स्निफर डॉग रॉकी याला घेऊन रेल्वे पोलिस गाडीत शिरले. ट्रेनमध्ये एखादा स्फोटक पदार्थ तर नाही, याची तपासणी ते करत होते. यावेळी स्निफर डॉग रॉकी S-4 कोचमधील टॉयलेटजवळ येऊन थांबला. तो सतत काही तरी शोधत असल्याचं दिसताच रेल्वे पोलिसांनी नीट तपासलं. तेव्हा टॉयलेटच्या छतावरील स्क्रू सैल झालेले दिसले.

रॉकी डॉगवर कौतुकाचा वर्षाव

रेल्वे पोलिसांनी स्क्रू काढून पाहिले असता गांजाची पाकिटं भराभर खाली पडली. त्यांची तापसणी केली असता हा गांजा 3 लाख 29 हजार 750 रुपये किमतीचा, तर 33 किलो वजनाचं असल्याचं समजलं. रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे. रेल्वेच्या रॉकी डॉगने 33 किलो गांजा पकडून दिल्याने रेल्वे विभागाद्वारे त्याचं कौतुक केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या

(Bhandra Railway Police Sniffer Dog Rockey detained Cannabis Ganja from Puri Ahmedabad Express Train)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.