मोठी बातमी! महाराष्ट्रातील नागपूर तर देशातील विविध विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी
नागपूर विमानतळावर आज (29 एप्रिलला) सकाळी 10 वाजता धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित धमकीचा ईमेल हा एयरपोर्ट डायरेक्टरच्या मेल आयडीवर आला आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रत्येक विमानतळावर आता सुरक्षेच्या कारणास्ताव जास्त बारकाईने लक्ष दिलं जात आहे. महाराष्ट्राचं नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा मेल आज विमानतळ प्रशासनाला मिळाल्याची माहिती आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी विमानतळ परिसरात सावधगिरी वाढविली आहे. धमकीचं गांभीर्य ओळखून तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या माध्यमातून विमानतळावर तपासणी देखील करण्यात आली. सुदैवाने नागपूर विमानतळावर कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसून आलेली नाही.
नागपूर विमानतळावर आज (29 एप्रिलला) सकाळी 10 वाजता धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित धमकीचा ईमेल हा एयरपोर्ट डायरेक्टरच्या मेल आयडीवर आला आहे. धमकीचा मेल आल्यानंतर त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आली. या प्रकरणी नागपूरच्या सोनेगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ईमेलचं गांभीर्य ओळखून विमातळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
देशातील इतर विमानतळांवर धमकीचे ईमेल
अशाच पद्धतीचे धमकीचे मेल देशभरातील अनेक विमानतळांवर आल्याचीही माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सर्व ठिकाणी आलेले धमकीचे मेल एकाच सोर्समधून करण्यात आल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जयपूर, कानपूर, गोवा आणि नागपूर विमानतळांवर धमकीचे ईमेल आले आहेत.
संबंधित धमकीचे मेल हे फेक ईमेल आयडीवरुन करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ईमेल आयडीच्या माध्यमातून आरोपींना ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे नुकतंच दोन दिवसांपूर्वी अशाचप्रकारे देशातील विविध विमानतळांवर धमकीचे ईमेल आले होते. राजस्थानच्या जयपूर इंटरनॅशनल एयरपोर्टवरही धमकीचा मेल आला आहे. अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतरही काहीही संशयास्पद आढळलं नाही.
गोव्यातील डाबोलिम विमातळावर वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकीचा ईमेल आला. यानंतर अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलीय यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक विमानतळावर दाखल झालं. विमानतळावर शोध मोहीम राबवली गेली. या शोध मोहीममध्ये काहीच सापडलं नाही. या धमकीच्या ईमेल प्रकरणी आता सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरु आहे. पण या धमकीमुळे हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम पडला नाही.