AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Murder : ‘आईनेच बाबांचा मर्डर केला’ कशी उलगडली मर्डर मिस्ट्री? मुलीनंच सांगितलं!

श्रद्धा हत्याकांड ताजं असतानाच आणखी एका हत्येचा खळबळजनक खुलासा

Chandrapur Murder : 'आईनेच बाबांचा मर्डर केला' कशी उलगडली मर्डर मिस्ट्री? मुलीनंच सांगितलं!
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 10:17 AM

चंद्रपूर : एकीकडे श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरण गाजतंय. अशातच दुसरीकडे चंद्रपूर (Chandrapur Murder News) जिल्ह्यातील एका पतीच्या खळबळजनक हत्याकांडाचं तब्बल तीन महिन्यांनी गूढ उकललं गेलंय. एका 66 वर्षीय व्यक्तीची तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच रचला होता, असा खळबळजनक खुलासा करण्यात आलाय. याप्रकरणी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मुलीनेच पोलिसात माहिती दिलीय. मुलीला आपल्या आईचं एक तीन महिने जुनं कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) सापडलं होतं. त्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आलीय.

3 महिन्यांपूर्वीच्या कॉल रेकॉर्डिंगने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील हत्याकांडाचं गूढ उकललंय. अनैतिक संबंधात अडसर ठरत असणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. या हत्याप्रकरणी आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आलीय.

6 ऑगस्ट 2022 रोजी ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरात राहणाऱ्या श्याम रामटेके यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी रंजना यांनी आपल्या दोन्ही मुलींना वडील हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावले असा निरोप दिला.

हे सुद्धा वाचा

आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली परत आल्या. रीतसर अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहते यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. मात्र तिला आईच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले.

रंजना रामटेके यांचे आंबेडकर चौकात छोटे जनरल दुकान आहे. या दुकानालगतच मुकेश त्रिवेदी यांचे भाजीपाला व बांगडी विक्रीचे दुकान आहे. मुकेश त्रिवेदी यांचे वारंवार घरी येणे मुलींना खटकू लागल्यावर दोघींनी आई व मुकेश त्रिवेदी दोघांनाही समाजात बदनाम होण्याबाबत समज दिली होती.

आई एकटीच राहत असल्याच्या काळात मुलीने तिला आपला स्मार्टफोन देऊ केला होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर तिने हा मोबाईल परत स्वतःकडे घेतला. त्यावेळेस तिला 6 ऑगस्ट रोजी पहाटेचे हे दहा मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले.

हे कॉल रेकॉर्डिंग एकून मुलगी हादरलीच. मुकेश त्रिवेदी या प्रियकराच्या मदतीने कट रचून आधी आईन जेवणात वडिलांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानं बेशुद्ध अवस्थेत आईनेच तिच्या प्रियकराच्या साथीने वडिलांची हत्या केली, असा आरोप मुलीने कालय.

वडिलांचे हातपाय बांधून आईने त्यांच्या तोंडावर उशी दाबली आणि वडिलांचा खून केला, असा आरोप करण्यात आलाय. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रंजना रामटेके व मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात धक्कादायक खुलासा झालाय.

पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.