मध्यरात्री रक्तरंजित थरार, मामानेच केली दोन भाच्यांची हत्या; नागपुरात असं काय घडलं?

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे जिथे एका मामाने उधारीच्या वादातून आपल्या दोन भाच्यांची हत्या केली आहे. रवी आणि दीपक राठोड या दोन्ही भावांना त्यांच्या मामा बदन सिंह याने चाकूने वार करून ठार मारले. बांगड्यांच्या विक्रीतील उधारी फेडण्याच्या वादामुळे हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

मध्यरात्री रक्तरंजित थरार, मामानेच केली दोन भाच्यांची हत्या; नागपुरात असं काय घडलं?
nagpur policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 12:45 PM

सर्वच नाती चांगली असतात असं नाही. कधी कधी नात्यातही दुरावा निर्माण होतो. एवढंच कशाला नात्यातील मंडळीही एकमेकांच्या जीवावर उठलेली आपण पाहतो. कुणी मुलाचा खून केला, तर कुणी आईवडिलांची हत्या केली अशा घटना आपण नेहमीच वाचत असतो. मालमत्तेचा वाद, पैशाचा वाद, तर कधी क्षुल्लक कारणावरूनही अशा हत्या होत असल्याचं आपण वाचत असतो. नागपुरातही अशीच एक घटना घडली आहे. मामानेच दोन भाच्यांची हत्या केल्याने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. याप्रकरणी मामा अटकेत आहे. पण दोन भाचे जीवानीशी गेले त्याचं काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या गांधीबाग गार्डनजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचं नाव बदन सिंह असं आहे. आरोपी हा मृतक रवी राठोड आणि दीपक राठोड यांचा मामा आहे. रवी आणि दीपक हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर आरोपी बदन सिंह हा त्यांचा दूरचा मामा आहे. दोघे भाऊ शहरातील हंसापुरी भागात राहायचे. दोघेही आरोपीकडून बांगडी खरेदी करून त्या शहरात विकायचे, अशी माहिती मिळते.

उधारीचा वाद

आरोपी मामा बदन सिंह याचा बांगडी विक्रीचा होलसेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे रवी आणि दीपक हे मामाकडून बांगडी विकत घ्यायचे आणि शहरात जाऊन ते विकायचे. त्यातून त्यांना चांगली मिळकतही व्हायची. कधी कधी दोघे मामाकडून उधारीवर बांगड्या खरेदी करून त्याची विक्री करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे उधारी राहिली होती. ही उधारी लवकरात लवकर फेडावी म्हणून बदन सिंह हे दोघाांकडे तगादा लावायचे. त्यामुळे दोघांमध्ये कुरबुर झाली. त्यातूनच ही हत्या घडल्याचं सांगितलं जात आहे.

मध्यरात्री रक्तरंजित थरार

रविवारी मध्यरात्री गांधीबाग येथील काली माता मंदिर समोर ही घटना घडली. मामा आणि भाच्यांमध्ये आर्थिक व्यवहारावरून शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक चकमकीवरून प्रकरण हाणामारीवर आलं. त्यातूनच आरोपी बदन सिंह याने रवीवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे रवी जागेवरच कोसळला. मामाने भावावर हल्ला केल्याने दीपकने भावाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे मामाने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. त्यात दीपक गंभीर जखमी झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच रवीचा मृत्यू झाला. तर दीपकचा आज पहाटे 4 वाजता मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आरोपीला तात्काळ अटक

या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला तात्काळ अटक केली आहे. त्याच्याकडील शस्त्रही पोलिसांनी जप्त केलं आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच दीपक आणि रवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान, या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातील क्रोर्य पाहून सर्वचजण हादरले आहेत.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.