Nagpur Crime | न्यायालयासमोरच बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड; बोगस बाँड बनवून कित्तेकांची जामिनावर सुटका, नागपुरात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

न्यायालयाकडून जामीन मिळालेल्या गुन्हेगारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणीही सॉलवंसी बनवून देण्यासाठी आपले दस्तावेज देत नाही. अशाच गुन्हेगारांकडून हजारो रुपये वसूल करून ही टोळी बनावट आधार कार्ड, बनावट रेशन कार्ड, बनावट घर टॅक्स पावती बनवून द्यायचे.

Nagpur Crime | न्यायालयासमोरच बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड; बोगस बाँड बनवून कित्तेकांची जामिनावर सुटका, नागपुरात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
न्यायालयासमोरच बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड; बोगस बाँड बनवून कित्तेकांची जामिनावर सुटकाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 5:00 PM

नागपूर : गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध झालेल्या नागपुरातील गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. ते गुन्हा केल्यानंतर न्यायालयातून जामीन मिळवल्यानंतर सॉलवंसी ( बाँड ) तयार करण्यासाठी थेट बोगस दस्तावेज वापरत असल्याचे समोर आलंय. या प्रकरणी गुन्हे शाखेने काल संध्याकाळी न्यायालयासमोर धडक कारवाई करत दोघांना अटक केली. गेल्या सहा वर्षांपासून असा गोरखधंदा सुरू आहे. शेकडो गुन्हेगार (Criminals) बोगस सॉलवंसीचा (Solvency) आधार घेऊन मोकाट झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आधार कार्ड एक मात्र त्याचे नाव मात्र वेगवेगळे. आधार कार्डचा क्रमांक ही वेगवेगळा आहे. म्हणजेच इतर कोणाचा आधार कार्ड आणि आधार नंबर वापरून त्यावर फोटो शॉपसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो मात्र दुसर्‍याच व्यक्तीचा लावण्यात यायचा. याच पद्धतीने नागपुरात काही गुन्हेगारांनी कोर्टातून जामीन मिळवल्यानंतर कोर्टाच्या नियमाप्रमाणे सॉलवंसी ( बाँड) भरण्यासाठी बोगस दस्तावेजच तयार केले. ते न्यायालयात सादर करून त्याआधारे बोगस सॉलवंसी बनवून ते जामिनावर (Bail) मोकाटही झाले. ही न्याय व्यवस्थेची फसवणूक आहे.

250 बनावट आधार कार्ड

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल संध्याकाळी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर याप्रकरणी सुनील सोनकुसरे, सतीश शाहू या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 250 बनावट आधार कार्ड, 106 बनावट रेशन कार्ड, एक हजारपेक्षा जास्त पासपोर्ट फोटो, लॅपटॉप, प्रिंटर, झेरॉक्स मशीन असं साहित्य जप्त केलं. या टोळीकडून अनेक बनावट सॉलवंसीही पोलिसांनी हस्तगत केले आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे सुनील सोनकुसरे आणि सतीश शाहूची टोळी गेले सहा वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोरच एका सुमो वाहनात बसायची. बनावट दस्तावेज तयार करून देण्याचा गोरखधंदा चालवत होती.

डुप्लिकेट घरटॅक्स पावतीही

न्यायालयाकडून जामीन मिळालेल्या गुन्हेगारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणीही सॉलवंसी बनवून देण्यासाठी आपले दस्तावेज देत नाही. अशाच गुन्हेगारांकडून हजारो रुपये वसूल करून ही टोळी बनावट आधार कार्ड, बनावट रेशन कार्ड, बनावट घर टॅक्स पावती बनवून द्यायचे. त्यानंतर जामीन मिळालेले गुन्हेगार याच बनावट दस्तावेजच्या आधारे सॉलवंसी तयार करून न्यायालयात सादर करायचे. धक्कादायक म्हणजे असे बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी या टोळीकडे एक हजारपेक्षा जास्त लोकांचे पासपोर्ट फोटो होते. सोबतच लगेच ऑनलाइन प्रक्रियेत उभे राहून दस्तावेज तयार करून घेण्यासाठी या टोळीचे अनेक हस्तकही तयार असायचे. आता या सर्वांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. भविष्यात त्यांनाही न्यायालयाच्या फसवणूक प्रकरणी आरोपी बनवले जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.