Gadchiroli Accident : गडचिरोलीत पिकअप वाहनाचा अपघात! दोघे ठार, चौघे जखमी

Gadchiroli Accident News : टाईल्स मार्बलचे काम करणारे मजूर पिकअप वाहनानातून प्रवास करत होते.

Gadchiroli Accident : गडचिरोलीत पिकअप वाहनाचा अपघात! दोघे ठार, चौघे जखमी
गडचिरोलीत अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 2:13 PM

गडचिरोली : गडचिरोलीच्या (Gadchiroli Accident News) आर्मिझा-गडचिरोली मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात (Road accident) झाला, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीररीत्या जखमी झालेत. आर्मिझा-गडचिरोली मार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. पिकअप (Pick Up Vehicle Accident) वाहनाचा चालक हा दुचाकीस्वाराला साईड डेत असताना गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पिकअप वाहनं थेट नाल्यात पडलं. सामानाची ने-आण करणाऱ्या या पिकअप वाहनाच्या अपघातात दोघांची जागीच जीव गमावल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तर जखमी झालेल्या चौघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातानंतर बचावकार्य करतानाही अडचणींचा सामना करावा लागत होता.

नेमकं काय घडलं?

टाईल्स मार्बलचे काम करणारे मजूर पिकअप वाहनानातून प्रवास करत होते. देसाईगंजवरुन ते गडचिरोलीला जायला निघाले होते. त्यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर आर्मिझा-गडचिरोली मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

राज्यात अपघाताचं सत्र

मुसळधार पावसात अनेकदा दृश्यमानत कमी झाल्यानंही अपघाताचा धोका वाढतो. तर दुसरीकडे अनेकदा गाड्या वेगानं चालवल्यानंही अपघात होण्याची शक्यता वाढते. दरम्यान, सोमवारी मध्य प्रदेशच्या धारमध्ये झालेल्या एसटी बसच्या भीषण अपघातात 13 जणांचा जीव गेला होता. अंमळनेर-इंदोर एसटी बस ही धारमध्ये एका पुलावरुन थेट नर्मदा नदीत कोसळून अपघात झालेलाहोता. यात एकूण 13 प्रवासी ठार झालेले.

हे सुद्धा वाचा

पाहा राजकारणातली मोठी बातमी : रामदास कदम काय म्हणाले?

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केलाय. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर जनजीवनही विस्कळीत झालंय. याचा फटका वाहतुकीवरही झाला असून सोमवारी जिल्ह्यातील तब्बल 28 मार्ग बंद झाले होते. तर दुसरीकडे धुव्वाधार पावसाचा जोर असाच काय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. गेल्या 24 तासांत गडचिरोलीत तब्बस 107.8 मिमी पावसाची नोंद झालीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.