Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Kidnapping : नागपुरात मुख्याध्यापकाचं अपहरण नाट्य, 30 लाखांची खंडणी मागितली, शोधमोहीम राबविताच आरोपींनी सोडले

आरोपींनी मुख्याध्यापकाचे अपहरण केले. त्यानंतर 30 लाख रुपये हवे असल्याची धमकी दिली. मुख्याध्यापकाच्या घरचे लोकं घाबरले. काय करावं त्यांना काही सूचत नव्हतं. अखेर त्यांनी जरीपटका पोलिसांत तक्रार केली.

Nagpur Kidnapping : नागपुरात मुख्याध्यापकाचं अपहरण नाट्य, 30 लाखांची खंडणी मागितली, शोधमोहीम राबविताच आरोपींनी सोडले
पंजाबमध्ये शाळा उडवण्याची धमकी
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 6:13 PM

नागपूर : नागपुरात एका मुख्याध्यापकाचं अपहरण (Kidnapping) करण्यात आलं. खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले होते. याची तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात करण्यात आली. मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानी (Pradeep Motiramani) यांचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आज सकाळीचं शोधमोहीम राबविली. त्यामुळं खंडणीखोर घाबरले. त्यांनी मुख्याध्यापकाला सोडून दिलं. आज दुपारी मुख्याध्यापक थेट जरीपटका पोलीस (Jaripatka Police) ठाण्यात पोहचले. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तपास सुरू होताच आरोपींनी मुख्याध्यापकाला सोडल्याची माहिती आहे.

30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

आरोपींनी मुख्याध्यापकाचे अपहरण केले. त्यानंतर 30 लाख रुपये हवे असल्याची धमकी दिली. मुख्याध्यापकाच्या घरचे लोकं घाबरले. काय करावं त्यांना काही सूचत नव्हतं. अखेर त्यांनी जरीपटका पोलिसांत तक्रार केली. तक्रारीची दखल घेत जरीपटका पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. याची माहिती मिळताच आरोपींनी मुख्याध्यापकाला सोडून दिलं. मुख्याध्यापक थेट जरीपटका पोलिसांत दाखल झाले.

पोलिसांनी राबविली शोधमोहीम

नागपूर पोलीस तत्पर असल्याचं यानिमित्तानं समोर आलं. घटनेची माहिती मिळताच त्यांनी ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली. योग्य दिशेने तपास सुरू केला. त्यामुळं आरोपींना भीती वाटली. या भीतीपोटी त्यांना मुख्याध्यापकाला सोडल्याची माहिती आहे. आता हे आरोपी कोण होते. याचा शोध पोलीस घेणार आहेत. मुख्याध्यापकाकडून विचारपूस करून या आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न पोलिसांना करावा लागणार आहे. याशिवाय आरोपींना जबर बसणार नाही.

हे सुद्धा वाचा

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.