Nagpur Accident CCTV | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

चालक पार्क केलेली पांढऱ्या रंगाची कार बाहेर काढत होता. त्याने गाडी रिव्हर्समध्ये घेतली. यावेळी ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी ड्रायव्हरने अ‍ॅक्सिलरेटरवर पाय ठेवला. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेली गाडी रिव्हर्समध्ये जोरदार वेगाने आली.

Nagpur Accident CCTV | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं
नागपुरात भीषण अपघात
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 11:51 AM

नागपूर : कार रिव्हर्स घेताना वाहन चालकाने बाळगलेली निष्काळजी रस्त्यावरील तरुणाला चांगलीच महागात पडली. ड्रायव्हरने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना ती जोरदार वेगाने मागे आली आणि कारने एकाला चिरडलं. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर दोघे जण थोडक्यात बचावले. नागपुरात घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. मेन रोडच्या जवळच संबंधित चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. ड्रायव्हर ती काढण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

संबंधित चालक पार्क केलेली पांढऱ्या रंगाची कार बाहेर काढत होता. त्याने गाडी रिव्हर्समध्ये घेतली. यावेळी ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी ड्रायव्हरने अ‍ॅक्सिलरेटरवर पाय ठेवला. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेली गाडी रिव्हर्समध्ये जोरदार वेगाने आली.

एक जण गंभीर, दोघे बचावले

यावेळी बाजूलाच असलेल्या सार्वजनिक बाकड्यावर तीन युवक मोबाईल बघत बसले होते. यातील दोघांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला, मात्र एक जण त्यात अडकला आणि कारच्या धक्क्याने गंभीर जखमी झाला. त्यानंतरही कार फिरुन दुसऱ्या बाजूला जाऊन थांबली.

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. परिसरातील व्यक्ती आवाज ऐकून धावत अपघातस्थळी पोहोचली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Couple Attacked | घराचं दार तोडून झोपलेल्या दाम्पत्यावर सपासप वार, नालासोपाऱ्यात खळबळ

अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

कस्टमर केअरला फोन केला, बँकेच्या माहितीची लिंक भरून पाठविली; गमावले साडेचार लाख

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.