17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध, 27 वर्षीय विवाहितेला बेड्या, अकोल्यात काय घडलं?

संबंधित महिला आणि अल्पवयीन मुलगा एकाच ठिकाणी काम करत होते. तिथे दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याची माहिती आहे. ते दोघं एकत्र फिरत असत. पण वयात जवळपास दहा वर्षांचं अंतर. त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असतील, असा संशयही कोणाला नव्हता.

17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध, 27 वर्षीय विवाहितेला बेड्या, अकोल्यात काय घडलं?
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:42 AM

अकोला : पतीपासून विभक्त राहत असलेल्या 27 वर्षीय महिलेला 17 वर्षीय मुलासोबत (Minor Boy) जडलेले प्रेमसंबंध चांगलेच महागात पडले आहेत. मुलगा अल्पवयीन असल्याने कायदेशीरदृष्ट्या त्याचा लैंगिक छळ केल्याचा ठपका महिलेवर ठेवण्यात आला आहे. महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे, तर मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सोपवण्यात आलं आहे. अकोला शहरातील (Akola Crime) किर्ती नगर खदान परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे. सुरुवातीला महिलेने पुण्याला  राहणाऱ्या आपल्याकडे नवऱ्याकडे पैसे आणायला गेल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र कसून चौकशी केली असता तिने 17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली देत काही काळ त्याच्याबरोबर राहिल्याचंही सांगितलं.

काय आहे प्रकरण?

संबंधित महिला आणि अल्पवयीन मुलगा एकाच ठिकाणी काम करत होते. तिथे दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याची माहिती आहे. ते दोघं एकत्र फिरत असत. पण वयात जवळपास दहा वर्षांचं अंतर. त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असतील, असा संशयही कोणाला नव्हता. महिला आपल्या बहिणीच्या सात वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. मात्र एका रात्री झोपलेल्या भाचीला घरात एकटी सोडून ती पसार झाली आणि या प्रकरणाचं बिंग फुटलं.

भाचीला टाकून पसार

27 वर्षीय तरुणी आणि तिच्या बहिणीची 9 वर्षांची मुलगी अशा दोघी जणी भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. चिमुरडी पाच वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हापासून ती आपल्या मावशीसोबत राहत. होती. महिलेचाही विवाह झाला आहे, मात्र पतीसोबत पटत नसल्यामुळे ते विभक्त राहतात. 31 जानेवारीपासून महिला घरी न परत आल्याने तिच्या घरमालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, तर 9 वर्षीय मुलीला महिला आणि बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले होते.

दुसरीकडे, अकोला शहरातील खदान परिसरात राहणारा संबंधित 17 वर्षीय मुलगा 31 जानेवारी 2022 रोजी घरातून रागारागाने निघून गेला होता. त्यामुळे त्याच्या पालकांनी खदान पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असतानाच 9 फेब्रुवारी 2022 रोजी तो घरी आला.

महिलेला अटक

सुरुवातीला तिने पुण्याला नवऱ्याकडे पैसे आणायला गेल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र कसून चौकशी केली असता तिने 17 वर्षीय मुलावर प्रेम असल्याचं सांगितलं. काही काळ आपण त्याच्याबरोबर राहिल्याची कबुलीही तिने दिली. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली खदान पोलिसांनी तिच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात अनैतिक संबंधांतून घरमालकिणीची हत्या, दहा दिवसांनी भाडेकरुला बिहारमध्ये बेड्या

14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.