चौथ्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या, आई म्हणते, तिच्या दीर-नवऱ्याकडून हत्या

पती आणि दीराच्या छळाला कंटाळून सोनी शुक्ला हिने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अकोला शहरात करवा चौथच्या दिवशीच उघडकीस आली.

चौथ्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या, आई म्हणते, तिच्या दीर-नवऱ्याकडून हत्या
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 1:42 PM

अकोला : करवा चौथच्या दिवशी उत्तर भारतीय समाजातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर कडक उपवास ठेवतात. मात्र याच दिवशी महाराष्ट्रात एका उत्तर भारतीय महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकोला शहरातील एका विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी तिचा पती आणि दीरावर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पती आणि दीराच्या छळाला कंटाळून सोनी शुक्ला हिने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अकोला शहरात करवा चौथच्या दिवशीच उघडकीस आली. घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी जखमी विवाहितेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता विवाहितेने पती आणि दीराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या कारणावरुन सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्या लेकीचा खून, आईचा दावा

पोलीस स्टेशनचे अधिकारी भानू प्रताप मडावी यांनी सांगितले की, महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा पती आणि दीराला अटक करण्यात आली आहे. विवाहितेच्या आईने मात्र आपल्या मुलीला जावई आणि त्याच्या भावानेच बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून देऊन जीवे ठार मारल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या :

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम

चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा, पाच जणांची बेदम मारहाण, भिवंडीत तरुणाचा मृत्यू

आई-बहिणीला दिलेल्या त्रासाचा वचपा, पॅरोलवर सुटलेल्या बापाची मुलाकडून हत्या

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.