ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख आणण्याचा तगादा, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून

सासरच्या माणसांनी गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. भावाच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. विवाहितेचा पती, दीर आणि सासूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख आणण्याचा तगादा, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून
अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 11:43 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींना सुनेकडे तगादा लावला होता. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडला. पती, दीर आणि सासूला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील चप्राड येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. सासरच्या माणसांनी गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. भावाच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. विवाहितेचा पती, दीर आणि सासूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पतीसह दीर-सासूला अटक

रंजना होमराज बघमारे (वय 25 वर्ष) असे हत्या झालेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी पती होमराज बघमारे (वय 28 वर्ष), सासू प्रमिला बघमारे (वय 55 वर्ष) आणि दीर संजय बघमारे (वय 26 वर्ष, सर्व राहणार चप्राड) यांना अटक करण्यात आली आहे.

दोन महिन्यातच छळ सुरु

लाखांदुर तालुक्यातील डाभेविरली येथील रंजनाचा विवाह गेल्या वर्षी मार्च महिन्यात चप्राड येथील होमराज बघमारे याच्यासोबत झाला होता. सुरुवातीला दोन महिने सुखात गेले. मात्र त्यानंतर सासरच्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी रंजनाला गळ घातली.

साडीने गळा आवळून खून

रंजनाने असमर्थता दाखवताच तिच्या छळ सुरु झाला. दरम्यान घटनेच्या दिवशी गर्भवती रंजनाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर साडीने गळा आवळून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी विवाहितेचा भाऊ सोमेश्वर बुराडे यांच्या तक्रारीवरुन पती, सासू आणि दीर यांच्याविरुद्ध कलम 304, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत सासऱ्याकडून सुनेची हत्या

दरम्यान, आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी मुंबईत उघडकीस आली होती. हत्येनंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी सासरा कमल राय (55 वर्ष), त्याचा साथीदार कृष्णा सिंग (45 वर्ष) आणि प्रमोद गुप्ता अशा तिघांना अटक केली होती.

पुण्यात ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या

दुसरीकडे, घरगुती वादातून सुनेने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह पोत्यात भरुन सूनेने झुडपात फेकला. मात्र या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलगा-सूनेला अटक केली होती. बेबी गौतम शिंदे असे हत्या झालेल्या सासूचे नाव होते. आरोपी पूजा मिलिंद शिंदे हिचे सासूसोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन वाद सुरु होते. त्याचाच राग मनात धरुन पूजाने ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून सासूचा खून केला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह तिने पोत्यात लपवला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भरलेलं पोतं तिने आधी टेरेसवर ठेवलं होतं. मात्र मृतदेह झुडपात टाकत असताना स्थानिक तरुणांनी पूजाला पाहिलं. शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता ही घटना उघडकीस आली.

संबंधित बातम्या :

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

सून आणि भाडेकरुमध्ये अफेअरची शंका, लहानग्यासह चौघांची निघृण हत्या; गुरुग्राममधील धक्कादायक प्रकार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.