घरासमोर जाऊन चौघांनी वाद घातला, 33 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार

सचिन मार्तण्ड ठाकरे असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खुशाल बोपचे, विशाल बोपचे, ज्ञानेश्वर बोपचे यांच्या विरोधात लाखनी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घरासमोर जाऊन चौघांनी वाद घातला, 33 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार
भंडाऱ्यात युवकावर जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 11:42 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : जुन्या वादातून 33 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा-पवार भागात हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

सचिन मार्तण्ड ठाकरे असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खुशाल बोपचे, विशाल बोपचे, ज्ञानेश्वर बोपचे यांच्या विरोधात लाखनी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धारदार चाकूने हल्ला

केसलवाडा येथे घराशेजारी राहणाऱ्या बोपचे कुटुंबातील चौघा जणांनी संगनमत करुन सचिन ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन वाद घातला. यात खुशाल बोपचे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने सचिनच्या पोट आणि डोक्यावर वार केले.

तरुणावर उपचार सुरु

लागलीच नागरिकांनी त्याला लाखनी रुग्णालयात दाखल केले. तिथून पुढील उपचारासाठी त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. लाखनी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि कलम 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लाखनी पोलिस करत आहेत.

भंडाऱ्यात शेजाऱ्याची हत्या

काही दिवसांपूर्वी आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने शेजाऱ्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला होता. 21 वर्षीय आरोपीने 49 वर्षीय शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याचा आरोप झाला होता. आरोपी तरुणाने गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. भंडारा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

संबंधित बातम्या :

आईला शिवीगाळ केल्याचा राग, 21 वर्षीय तरुणाकडून शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या

ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा, हिंजवडी पोलिसांची भन्नाट कामगिरी

सायकल लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद, 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.