आईला शिवीगाळ केल्याचा राग, 21 वर्षीय तरुणाकडून शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या

मध्यरात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत कारची तोडफोड आणि आईलाही शिवागीळ करण्याचा वादावरुन हा प्रकार घडला. गळा चिरून हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरातील गांधी वार्डात घडली.

आईला शिवीगाळ केल्याचा राग, 21 वर्षीय तरुणाकडून शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या
(डावीकडे) आऱोपी, (उजवीकडे) मयत शेजारी
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 10:51 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने शेजाऱ्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय आरोपीने 49 वर्षीय शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी तरुणाने गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले आहे. भंडारा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दारुच्या नशेत कारची तोडफोड

मध्यरात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत कारची तोडफोड आणि आईलाही शिवागीळ करण्याचा वादावरुन हा प्रकार घडला. गळा चिरून हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरातील गांधी वार्डात घडली. आरोपीने स्वतःच मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले.

शेजाऱ्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे

मोहाडी येथील गांधी वार्डातील 49 वर्षीय मृतक गंगाधर उर्फ बंग्या नत्थु निमजे आणि 21 वर्षीय आरोपी आकाश विजय श्रीपाद यांची घरं एकमेकांच्या जवळच होती. त्यांचं नेहमी एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. गंगाधर निमजे याने मद्यपान करून आरोपी आकाश श्रीपादच्या घरी जाऊन आईसोबत भांडण केले.

सायकलचा काटेरी कुंपण गेयर गळ्यावर मारला

एवढ्यावरच न थांबता त्याने समोर उभ्या असलेल्या मारुती ओम्नी कारची तोडफोड केली.यामुळे आकाश श्रीपादचा राग खूप अनावर झाला. रागाच्या भरात घरात असलेल्या सायकलचा काटेरी कुंपण गेयर संपूर्ण ताकदीने त्याने बंग्या नत्थु निमजेच्या गळ्यावर मारला. यामुळे घटनास्थळीच तो मृत्यू पावला.

आरोपीचे आत्मसमर्पण

21 वर्षीय आरोपी आकाश विजय श्रीपादने स्वतःच मोहाडी पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

पोटच्या मुलीवर वाईट नजर ठेवल्याचा राग, प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत, 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या

फेसबुकवरील मैत्रीला भुलली, गिफ्टच्या नावाखाली 9 लाखांचा गंडा, पुण्यात उच्चशिक्षित तरुणी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.