सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके

लोणार तालुक्यातील भुमराळा शिवारात वृद्ध महिलेची हत्या करुन तिच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना समोर आली होती. कपाशीच्या शेतात 65 वर्षीय वृद्ध महिला कासाबाई चौधरी यांचा मृतदेह आढळला असल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके
मयत चुलत सासू
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 11:03 AM

बुलडाणा : चुलत सुनेनेच सासूची हत्‍या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या हव्यासपोटी सासूच्या अंगावरुन दागिने ओरबाडले, तर कानाचेही लचके तोडले होते. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्‍यात ही थरारक घटना घडली.

काय आहे प्रकरण?

लोणार तालुक्यातील भुमराळा शिवारात वृद्ध महिलेची हत्या करुन तिच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना समोर आली होती. कपाशीच्या शेतात 65 वर्षीय वृद्ध महिला कासाबाई चौधरी यांचा मृतदेह आढळला असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. कासाबाई यांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले होते, तर कानाचे लचकेही तोडलेले होते.

मारेकऱ्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. तपासावेळी पोलिसांनी खून प्रकरणात तिच्या चुलत सुनेला अटक केली. तिने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतात काम करताना सासूची हत्या

नंदाबाई उद्धव चौधरी असे आरोपी महिलेचे नाव असून, सोने-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी तिने चुलत सासूचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी नंदाबाई आणि मृत कासाबाईंचे शेत शेजारी-शेजारीच आहे. 18 सप्टेंबरच्या सायंकाळी दोघीही आपापल्या शेतात काम करत होत्या. नंदाबाईने चुलत सासू कासाबाईंच्या अंगावरील दागिने मिळवण्यासाठी तिची हत्या केली. कानाचे लचके तोडून दागिने लांबवले.

श्वान चुलत सुनेच्या घराबाहेर घुटमळला

संध्याकाळ होऊनही कासाबाई घरी न परतल्याने शोध घेतला असता त्‍यांचा मृतदेह शेतात सापडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी श्वान हा आरोपी नंदाबाईंच्या घराजवळ घुटमळत होता. तर पोलिसांनी गावातही चौकशी केली असता पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी नंदाबाईची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अखेर तिने खून केल्याची कबुली दिली. आरोपी नंदाबाईला अटक करुन तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात हिटर छातीला कवटाळून विवाहितेची आत्महत्या

दरम्यान, घरातील विद्युत हिटर आपल्या छातीस कवटाळून विवाहितेने आत्महत्या केली. हिटरचा शॉक लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धनश्री अजित करडे असे दौंड तालुक्यातील यवतमधील मयत महिलेचे नाव आहे.

सासरी जाच झाल्याचा आरोप

चारचाकी गाडी घेण्यासाठी महिलेला सासरी त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्याची मागणी करुन तिला शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक आणि शारीरिक छळ देत होते. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी यवत पोलीसांनी मयत विवाहित महिलेची सासू, नवरा, दीर आणि नणंद अशा चौघा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतही महिलेचा राहत्या घरी गळफास

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरीही आढळली होती.

ओढणीने गळफास घेत महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली, हे समजू शकलेले नाही.

संबंधित बातम्या :

ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.